Sharad Pawar : जम्मू-काश्मीरमधील(Jammu and Kashmir) पहलगाम(Pahalgam) परिसरात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात (Terroristhttps://mulukhmaidan.com/ganbotes-family-told-sharad-pawar-everything/ Attack,) २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या हल्ल्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील पर्यटकांना बसला असून, राज्यातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पुण्यातील बालपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश असून, त्यांच्या मैत्रीचा अंत असा होईल, याची कल्पनाही कुटुंबीयांना नव्हती.
संतोष आणि कौस्तुभ हे आपापल्या कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. मात्र पहिल्याच दिवशी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. शरद पवार(Sharad Pawar) यांनी दोन्ही कुटुंबीयांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या दु:खात सहभागी झाले.
कुटुंबीयांची अंगावर शहारे आणणारी आपबीती
शरद पवार यांच्या भेटीदरम्यान संतोष जगदाळे(sandip jagdale) यांच्या पत्नीने संताप व्यक्त करत दहशतवाद्यांना ठार मारण्याची मागणी केली. “दहशतवाद्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळी घातली, चेहराही बघू दिला नाही. त्यांनी आमच्या माणसांना अमानुषपणे ठार केलं,” असे त्यांनी दुःखद शब्दांत सांगितले.
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनेही शरद पवार यांना थरकाप उडवणारा अनुभव सांगितला. “आम्ही सर्व महिला त्या क्षणी मोठमोठ्याने अजान म्हणत होतो. आमच्या टिकल्या काढून फेकल्या. एक मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण दहशतवाद्यांनी त्यालाही कपडे काढून गोळ्या घातल्या. आम्हाला अजान म्हणायला लावलं, पण तरीही आमच्यावर गोळ्या झाडल्या. आम्ही चिखलात पडत होतो, घोड्यावरून उतरताना भीतीने थरथरत होतो,” असे त्यांनी सांगितले.
दहशतवाद्यांच्या क्रौर्याची साक्ष
कौस्तुभ यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुस्लीम घोडेवाला सतत दहशतवाद्यांना विनंती करत होता की हे लोक निरपराध आहेत. पण त्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष करत त्यालाही ठार करण्यात आले. “तो आमच्यासाठी रडत होता, मदत करत होता, पण त्यालाही वाचवलं गेलं नाही,” अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ganbotes-family-told-sharad-pawar-everything






