‘गजनी’ चित्रपटातील सुंदर अभिनेत्री आठवते का? आज दिसते ‘अशी’ ओळखणे आहे कठिण

२००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘गजनी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. बॉलीवूडच्या सर्वात ब्लॉकबास्टर चित्रपटांमध्ये गजनीचा समावेश होतो. आमिर खानच्या या चित्रपटात मुख्य भुमिका अभिनेत्री आसिनने निभावली होती. या चित्रपटानंतर आसिन रातोरात स्टार बनली होती.

केरळमध्ये जन्मलेली आसिन बॉलीवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार देखील आहे. तिचे वडील सीबीआय ऑफिसर होते. तर आई डॉक्टर होती. त्यामूळे आसिनने देखील शिक्षणात काहीही कमी ठेवली नाही. तिने तिचे शिक्षण पुर्ण केले.

खुप कमी वयात आसिनने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. त्यामूळे तिला अभिनयाच्या ऑफर सुरु झाल्या. फक्त वयाच्या १५ व्या वर्षी आसिनने साऊथ चित्रपटामधून अभिनयात प्रवेश केला होता. त्यावेळी तिच्या आईने नेहमीच तिची साथ दिली.

आसिनने मल्ल्याळम चित्रपटातून अभिनयात प्रवेश केला होता. अभिनेत्री पद्मिनीनंतर आसिन एकमेव अशी अभिनेत्री आहे जिने कोणत्याही भाषेच्या चित्रपटामध्ये डबिंग केली नाही. प्रत्येक चित्रपटात तिने स्वत चा आवाज वापरला आहे. तिला क्वीन ऑफ कॉलीवूड म्हणून देखील ओळखले जाते.

आसिनने मल्ल्याळम, तेलगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. साऊथच्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत आसिनची जोडी जमली होती. खुप कमी वेळात आसिन साऊथची टॉपची अभिनेत्री बनली होती. पण तिचे हे यश इथेच थांबले नाही. ती बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री बनली.

साऊथमधील प्रसिद्धमूळे आसिनला बॉलीवूडमधून देखील अनेक ऑफर येऊ लागल्या. २००८ मध्ये आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपटातून आसिनने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर तिने कधीच मागे वळून पाहीले नाही. एकापेक्षा एक हिट चित्रपट तिने केले.

आमिर खाननंतर ती सलमान खानसोबत ‘रेड्डी’ चित्रपटात दिसली. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर आसिन बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री बनली. पण तिचे हे यश जास्त काळ टिकू शकले नाही. खुप कमी वेळात ती इंडस्ट्रीतून गायब झाली.

फक्स आमिर आणि सलमानच नाही तर अक्षय कुमारसोबतही आसिनची जोडी सुपरहिट झाली होती. दोघांनी चित्रपटांमध्ये काम केले. असे बोलले जाते की, अक्षयमूळेच आसिनला तिचा जीवनसाथी मिळाला होता. अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर देखील तिचे नाव कोणत्याही अभिनेत्यासोबत जोडले गेले नाही.

आसिन अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी वेगवेगळ्या भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले. आसिन आठ पेक्षा अधिक भाषा बोलू शकते. याच गुणांमूळे तिला इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख निर्माण झाली होती. बॉलीवूडमध्येही तिने चांगलेच नाव कमवले होते.

पण २०१३ नंतर ती जास्त चित्रपटांमध्ये दिसली नाही. तिने अभिनयापासून दुर जाण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये आसिनने बिजनेस मॅन राहूल शर्मासोबत लग्न केले. लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय आसिनचा होता.

२०१७ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला आणि आत्ता ती तिच्या कुटूंबात खुप आनंदी आहे. अभिनयापासून लांब गेली असली तरी आसिन नेहमीच एक उत्तम अभिनेत्री असणार आहे. ती कुटूंबासोबतच नवऱ्याचा बिजनेस देखील चालवते. चित्रपटांपासून दुर असली तरी तिचा चाहता वर्ग कमी झाला नाही.

महत्वाच्या बातम्या –
सलमान खान, माधूरी दिक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या साहिला चड्डाची आज झाली आहे वाईट अवस्था
अमिताभ बच्चनने दुसऱ्यांदा राजकारणात यायला दिला नकार; चिडलेल्या राजीव गांधीने राजेश खन्नाला बनवले स्टार
ऋषी कपूरने नीतू सिंगला हिऱ्याचा हार देत लग्नासाठी केले होते प्रपोज; वाचा त्यांची हटके लव्ह स्टोरी
अमिताभ बच्चनला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधींनी राजेश खन्नाची घेतली होती मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.