Share

Gajanan Kirtikar : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती नको, भाषणाआधीच उद्धव ठाकरेंना शिवसेना खासदाराचा घरचा आहेर

Mahavikas Aghadi

Gajanan Kirtikar : शिवसेनेतील फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राज्यात शिवसेनेमध्ये वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

गोरेगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच दसरा मेळाव्याच्या वादानंतरची ही पहिलीच सभा असल्याचे सर्वांना याची उत्सुकता लागली आहे.

उद्धव ठाकरे या सभेमध्ये विविध मुद्द्यांवर बोलणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे सभेला पोहोचलेले आहेत. त्यांनी या सभेत ठाकरेंशी एका मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात कीर्तिकर यांनी एक मोठे विधान केले आहे.

गजानन कीर्तिकर पुन्हा भाजपशी युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंशी बातचीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती चुकीची असल्याचेही ते म्हणाले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रयोग संपला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे आपापसातील भांडण आणखी किती दिवस चालणार? त्यापेक्षा समेट करा, एकत्र या, असे शिंदेंशी आणि ठाकरेंशी बोलले असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेची पुढील वाटचाल ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत असता कामा नये हे आजही आमचे ठाम म्हणणे आहे, असे ते म्हणाले.

शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावे असे गजानन कीर्तिकरांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच याबाबत शिवसेनेची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका पुढे आहेत. या निवडणुकीच्या तयारीपूर्वी मुंबईच्या संपूर्ण बैठकप्रमुखांचा मेळावा गोरेगावला होत असतो. ही शिवसेनेची परंपरा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या
supreme court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची ‘लाईव्ह’ सुनावणी होणार; वाचा नेमकं काय घडलं?
Aurangabad : नादच खुळा! स्प्लेंडरची चैन अन् मारूतीचे इंजिन, औरंगाबादच्या पठ्याने घरीच बनवले हेलिकॉप्टर 
sharad koli : बऱ्या बोलानं शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्या नाहीतर.., युवा सेनेची शिंदे गटाला उघड धमक
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now