‘गदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा खुलासा म्हणाले, ‘आम्ही छोटे होतो म्हणून कलाकार गदर चित्रपटाला द्यायचे नकार

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा काही अभिनेत्री व अभिनेते चित्रपटांना नकार देतात. त्यासाठी अनेक कारणे असतात. एखाद्या चित्रपटाला नकार देणे कधी कधी त्यांची सर्वात मोठी चुक ठरू शकते. अशीच एक चुक अभिनेत्री काजोलने केली होती.

काजोलने एका हिट चित्रपटाला नकार दिला होता. तो चित्रपट होता ‘गदर’. आज गदर चित्रपटाला बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटामध्ये गणले जाते. पण काजोलने त्यावेळी या चित्रपटाला नकार दिला होता. ही तिच्या करिअरमधील सर्वात मोठी चुक होती.

अनिल शर्माने गदर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ज्यावेळी अनिल शर्मा गदर चित्रपटावर काम करत होते. त्यावेळी त्यांनी सकिनाच्या भुमिकेसाठी काजोलला फायनल केले होते. त्यांना काजोल मुख्य अभिनेत्री म्हणून हवी होती.

चित्रपटाची स्क्रिप्ट पुर्ण झाल्यानंतर अनिल शर्मा ती स्क्रिप्ट घेऊन काजोलकडे गेले. काजोलला देखील चित्रपटाची स्टोरी खुप जास्त आवडली होती. पण तरीही तिने या चित्रपटाला नकार दिला होता. अनेक वर्षांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

अनिल शर्माने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. पण इंडस्ट्रीमध्ये अशा अभिनेत्री होत्या. ज्यांनी गदर चित्रपटाला नकार दिला होता. यामागचे नेमके कारण काय आहे ते त्यावेळी समजले नाही’.

त्यांनी पुढे सांगितले, ‘सर्वात पहीले हा चित्रपट अभिनेत्री काजेलला ऑफर झाला होता. पण तिने कधी वेळेचे कारण सांगितले. तर कधी दुसरे काही कारण. कोणते ना कोणते कारण देत काजोल चित्रपटाला नकार देत होती. त्यावेळी इंडस्ट्रीतील लोकांना आमच्यासोबत काम करण्यासाठी आम्ही खुप छोटे वाटत होतो. म्हणून ते कारण सांगत चित्रपटाला नकार द्यायचे’.

काजोलने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘तिच्याकडे गदर चित्रपटासाठी वेळ नव्हता. ती अनेक चित्रपटांमध्ये काम करत होती. म्हणून तिने या चित्रपटाला नकार दिला’. सत्य काय आहे हे त्यांनाच माहीती. पण काजोलने एक हिट चित्रपट गमवला होता.

महत्वाच्या बातम्या –
संपत्तीच्या बाबतीत मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना मागे टाकते ‘सिंघम’ चित्रपटातील अजय देवगनची अभिनेत्री
सलमान खानला अभिनेता नाही तर क्रिकेटर बनवणार होते सलीम खान पण….
….म्हणून काजोलने ‘गदर’सारख्या हिट चित्रपटाला दिला नकार
‘हम काले हुए तो क्या हुआ’ गाण्यामूळे मनोज कुमार आणि मेहमूदमध्ये झाले होते मोठे भांडण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.