बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची चाहत्यांनी बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा केली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून तो चर्चेत राहिला आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओलने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
अशा परिस्थितीत सनी देओलला तारा सिंगच्या अवतारात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सनी देओलने सोशल मीडियावर ‘गदर 2’चे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली आहे. सनी ‘गदर’मध्ये हँडपंप उखडताना दिसला होता, यावेळी तो हातात हातोडा घेऊन दिसत आहे.
पोस्टरमध्ये सनी तारा सिंगच्या अवतारात डोळ्यात राग, हातात हातोडा आणि हिरव्या पगडीसह काळ्या कुर्तामध्ये दिसत आहे. पोस्टर पाहूनच सनी ‘गदर 2’ घेऊन पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राज्य करणार असल्याचे दिसते. पोस्टर शेअर करताना सनी देओलने लिहिले की, ‘हिंदुस्तान जिंदाबाद है… जिंदाबाद था… और जिंदाबाद रहेगा!
या स्वातंत्र्यदिनी आम्ही तुमच्यासाठी दोन दशकांनंतरचा भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा सिक्वेल घेऊन येत आहोत. 11 ऑगस्ट रोजी गदर 2 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यासोबतच सनी देओलनेही सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर: एक प्रेम कथा’ 2001 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सनी देओलशिवाय अमिषा पटेल आणि अमरीश पुरी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि अशा परिस्थितीत ते ‘गदर 2’ चीही आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘गदर 2’ स्वातंत्र्य दिनापूर्वी 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सनी देओल तारा सिंहच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. सनीला त्याच जुन्या स्टाईलमध्ये पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या फोटोंमध्ये गुलजार खानही सनी देओलच्या शेजारी उभा असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात गुलजार खान यांनी तारा सिंगचा मित्र मुश्ताक खानची भूमिका साकारली होती.
महत्वाच्या बातम्या
‘मी रात्रभर झोपू शकलो नाही’, सूर्याला कसोटी संघात निवडल्याने संतापला सर्फराज खान; दु:ख व्यक्त करत म्हणाला..
मविआ जिंकणार लोकसभेच्या ३४ जागा, भाजप-शिंदेगटाला बसणार मोठा फटका! सर्वेतून समोर आले निष्कर्ष
प्रचंड पैसा कमावूनही ‘पठाण’ फ्लॉपच? समोर आलं ‘हे’ सर्वात मोठं कारण