पुण्यात अंत्यविधीसाठी शंभरहून जास्त लोकं, नातेवाईक मृताचे पाय धुऊन पाणीही प्यायले

पुणे । राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच राज्यातील लग्नसोहळ्यांसोबतच अंत्यविधीसाठीही निर्बंध लावण्यात आले आहेत.

यामध्ये लग्नासाठी २५ लोकांना तर अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांनाच परवानगी दिली आहे. मात्र अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही, असाच एक प्रकार पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडला.

पुण्यातील लोणी काळभोरमध्ये एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीला अनेक लोकांनी उपस्थिती लावली. तसेच अंत्यविधी करताना नातेवाईकांनी मयत व्यक्तीचे पाय धुऊन पाणीही प्यायले, हात लावून दर्शनही घेतले.

एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करुन हा सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत कारवाई करणार असल्याचे सांगितले. यामुळे अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

अनेक ठिकाणी लग्न सोहळ्यात देखील मोठी गर्दी केली जात आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. यामुळे भविष्यात अजून कडक नियम लागू केले जाऊ शकतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.