फुलाला सुगंध मातीचा मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

स्टार प्रवाह वाहिनी प्रसिद्ध वाहिनीमधील एक आहे. या वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस आलेल्या दिसतात. या वाहिनीवरील अनेक मालिकांनी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच या वाहिनीने इतर वाहिन्यांसारख आपल एक वेगळ स्थान निर्माण केल आहे.

आज आपण या वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेविषयी माहिती घेणार आहोत. या मालिकेतील शुभम आणि कीर्तीची जोडी प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडते. अभिनेता हर्षद अतकरी आणि अभिनेत्री समृद्धी केळकर यांच्या अभिनयाने मालिका फुलासारखी हळूहळू खुललेली पाहायला मिळते.

या मालिकेत आता एका नवीन अभिनेत्याची एन्ट्री होत असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत शुभम आणि कीर्ती पाककलेच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबईला रवाना झाल्याचे दिसून येते. या प्रवासादरम्यान त्यांची गाडी बंद पद्तेपाडते आणि त्याच वेळी किरण नावाचे नवीन पात्र त्यांना मदतीला धावून जाते.

किरणचे पात्र साकारणाऱ्या अभिनेता आपल्यासाठी नवीन नाही. त्याने अगोदरच आपल्या अभिनयाने मनोरंजन सृष्टीत आपले नाव कोरले आहे. किरण म्हणजेच अभिनेता ‘शेखर फडके’. शेखरने आपल्या विनोदी भूमिकांनी प्रक्षकांची माने जिंकली आहेत. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या शेखरने ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकात बालपणीच्या राजाराम यांची भूमिका साकारली होती.

कॉलेजमध्ये असताना त्याने ‘मृगजळ’ या स्पर्धेत भाग घेतला होता त्यात त्याला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. तेथूनच परीक्षकांनी त्याला व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी दिली, आणि तेथूनच त्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली.

‘टू माझा सांगती’ या मालिकेत त्याने ज्ञानेश्वर महाराजांच्या वडलांची म्हणजेच विठ्ठलपंतांची भूमिका साकारली होती. तसेच ‘सरस्वती’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे भरपूर कौतुक झालेले आपल्याला पाहायला मिळाले. सरस्वती मालिकेत त्यांनी ‘भिकुमामा’ची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांची विरोधी भूमिका असली तरी त्यांच्या विनोदी पैलूमुळे त्यांची भूमिका सर्वांनाच भावली.

makaransankranti 2017 marathi actor shekhar phadke wishes makarsankranti to  his fans | मकरसंक्रातीला या मराठी अभिनेत्याने मागितली सर्वांची माफी |  Loksatta

‘विठूमाऊली’ मालिकेतही त्यांची विरोधी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. ही भूमिका पार पाडतअसताना त्यांना एका आजीचा मारही खावा लागला होता. ‘पुंडलीकाला का त्रास देतो’ असे म्हणत आजीने शेखरला काठीने चोप दिला होता. ही आठवण स्वतः त्यांनीच सोशल मिडीयावर शेअर केली होती.

या घटनेवरून ते त्यांच्या अभिनयात किती परफेक्ट होते हे आपल्याला लक्षात येते. एखादी भूमिका प्रेक्षकांपर्यंत अगदी तंतोतंत पोहचते आणि त्यांच्या मनात उतरते हे याचे अगदी बरोबर उदाहरण आहे. शेखर नुकताच ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत किरणच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेत त्याची भूमिका काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हे ही वाचा-

दोन्ही कोराना लशी सुरत, अफवांपासून सावध राहा पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन

शार्दूलला सामनावीर तर भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार का नाही दिला? विराट भडकला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.