इम्युनिटी वाढवण्यासाठी ही ७ फळे खा आणि आजारपणाला दूर ठेवा

कोरोनाच्या काळात इम्युनिटी वाढवण्याची गरज सगळ्यांनाच आहे. कारण कोरोनाला रोखण्यासाठी इम्युनिटी वाढवण्याची खूप गरज आहे. थंडीच्या दिवसात संसर्गजन्य आजारांचा धोका खूप जास्त आहे.

जसे की सर्दी, ताप, खोकला हे आजार इत्यादी आजार खूप झपाट्याने पसरतात. इम्युनिटी वाढवण्यासाठी सध्या सगळेजण काढा, ज्यूस किंवा आयुर्वेदिक चहाचे सेवन करत आहेत पण यासोबत जर आपण फळांचे सेवन केले तर आपल्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला काही फळे सांगणार आहोत ज्यामुळे इम्युनिटी वाढण्यास खूप मदत होते. प्लम हे फळ त्यातीलच एक फळ आहे ज्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे कॅन्सरपासून वाचवण्यासाठी मदत करते. डाळिंब हे फळ सगळ्याना माहीत आहे.

डाळिंब हे गोड असते आणि रक्त पातळ करण्यासाठी याचा खूप फायदा होतो. याशिवाय वजन कमी करणे, रक्तदाब, हृदय यासाठी डाळिंब खूप फायदेशीर आहे. मोसंबी हे इम्युनिटिसाठी सगळ्यात प्रभावी फळ आहे.

यामध्ये व्हिटॅमिन सी असते याचा ज्यूस करून पिणेही फायदेशीर आहे. सफरचंद हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर असे अनेक घटक असतात जे आजारपण दूर ठेवतात.

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी संत्रा खूप फायदेशीर आहे. हे आपल्याला शरीराच्या आतून चांगले बनवते. याचा ज्युसही तुम्ही पियू शकता. थंडीच्या काळात नाशपती या फळाला सगळ्यात जास्त मागणी आहे.

नाशपतीचा ज्यूस पिण्यासाठी चांगला असतो. यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेट्री गुण आहेत. पेरूलाही कोरोनाच्या काळात जास्त मागणी असते. यामध्येही अँटी ऑक्सिडंट असतात. हे घटक संसर्ग न होण्यासाठी चांगले असतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते तसेच डायबेटीजच्या रुग्णांवर ही पेरू प्रभावी आहे.

महत्वाच्या बातम्या-

वॉर अँड पीस! आत्मह.त्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट

१ डिसेंबरपासून ATM, गॅस ते विम्यासंदर्भातील नियम बदलणार; जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.