महिलांच्या या सवयीवरून त्यांना मिळाली बिझनेसची भन्नाट आयडिया, आता आहे हजारो कोटींचा मालक

जेव्हा शॉपिंगची वेळ येते तेव्हा स्त्रीच्या चेहऱ्यावर लगेच आनंद येतो. या कामाला महिला एका पायावर तयार होतात. अनेकदा महिला खरेदी करताना पैशांचा विचार करत नाहीत. याचाच फायदा घेऊन दोघांनी (त्रिलोकी चंद, नरेंद्र सिंह) TCNS 18 ही कंपनी सुरू केली.

ते या कंपनीच्या आधारे आता कोट्यावधींची कमाई करत आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की टीसीएनएस कपड्यांचे आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) आले आहेत. ११२५ कोटी रुपये उभे करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीचे मूल्यांकन अंदाजे ४४०० कोटी रुपये आहे.

संस्थापक ओकनेर सिंह, ज्यांनी 18 वर्षांपूर्वी कंपनी सुरू केली होती. त्यांनी फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, महिलांच्या खरेदी करण्याच्या कल्पनेवर त्यांनी सप्टेंबर २००२ मध्ये लाजपत नगर येथे पहिले दुकान सुरू केले.

परंतु बहुतेक महिला फक्त बाहेरून स्टोर बघायच्या पण स्टोरमध्ये प्रवेश करत नव्हत्या. म्हणूनच, आपल्या चुकातून शिकत त्यांनी स्टोअरमध्ये एक बुटीक उघडले आणि ९९९ आणि २९९९ रुपयांपर्यंत कपड्यांची विक्री करण्यास सुरूवात केली.

तसेच दुकानाचा आकारही त्यांनी कमी केला. त्यांची आयडीया हीट झाली आणि त्यांचा व्यवसाय जोमाने सुरू झाला. ओंकार सिंह म्हणतात की टीसीएनएसची सुरुवात त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी केली होती. म्हणूनच त्यांच्या कंपनीचे नाव त्रिलोकी चंद आणि वडील नरेंद्र सिंह यांचे नावावरून ठेवण्यात आले आहे.

ओंकार सिंग यांचा लहान भाऊ अरविंद्र सिंग निर्यातीचा व्यवसाय सांभाळतात. ऑरेलिया, डब्ल्यू आणि विशफूल ब्रांड टीसीएनएस कपड्यांचे आहेत. या ब्रँड अंतर्गत कंपनी वूमन एथनिक आणि फ्यूजन वेअरची विक्री करते. कंपनीकडे महिलांचे अनेक ब्रॅण्डचे कपडे आहेत.

कंपनीकडे ४६५ एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स आहेत. तसेच कंपनीकडे १४६९ मोठे आउटलेट्स आणि १५२२ मल्टिब्रँड आउटलेट्स आहेत. टीसीएनएस कपड्यांचा आयपीओ वर्गणीसाठी उघडला आहे. गुंतवणूकदार या इश्यूमध्ये पैसे लावू शकतात.

इश्यूसाठी ७१४ ते ७१६ रुपयांची किंमत बँड निश्चित केली गेली आहे. या प्रकरणाद्वारे कंपनीची ११२५ कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे. टीसीएनएस कपड्यांच्या आयपीओमध्ये २० शेअर्सची लॉज साईज ठेवण्यात आली आहे.

तुमच्या माहितीसाठी या आयपीओ वर प्रभुदास लीलाधर, हेम सिक्युरिटीजला सब्सक्राईब करण्याचा सल्ला दिला जातो. चॉईस ब्रोकिंगने त्यापासून दूर राहण्याचे सुचविले आहे. टीसीएनएस कपड्यांचे व्यवस्थापकीय संचालक आनंद डागा यांनी सीएनबीसी-आवाजशी संवाद साधताना सांगितले की, अँकर इन्व्हेस्टर्सकडून ३३७ कोटी रुपये जमा केले आहेत.

कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. तसेच, कंपनीच्या तिन्ही ब्रँडमध्ये बरीच वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ओएफएसनंतर कंपनीमधील प्रोमोटर्सचा वाटा ४३.७ टक्क्यांवरून घसरून ३२.५ टक्क्यांवर जाईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा.

महत्वाच्या बातम्या
मुलगी रोज फोन करायची, डॉक्टर म्हणायचे वडील बरे आहेत, कारण समोर आल्यावर कुटुंबीय हादरले
करीना कपूरने विद्या बालनवर केली खूपच घाणेरडी कमेंट, म्हणाली ही जाडी….
एकेकाळी घरोघरी जाऊन सायकलवर विकले सामान, आज आहे ५ हजार ५२४ कोटींचा मालक
भारतात का झाला कोरोनाचा उद्रेक? WHO च्या टॉपच्या सायंटिस्टने सांगितली ‘ही’ कारणे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.