गेल्या महिन्याभरापासून घरी बसून आहेत नट्टूकाका, शुटींगला बोलवण्यात येत नाही; कारण…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक लोकांसाठी अडचणी वाढवल्या आहेत. कोरोनामूळे चांगल्या चांगल्या लोकांची अवस्था खराब झाली आहे. परत एकदा फिल्म इंडस्ट्रीवर मोठे संकट आले आहे. अनेक मोठे चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

शुटींग बंद पडल्यामूळे कलाकारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामूळे इंडस्ट्रीतील लोकांवर खुप वाईट दिवस आले आहेत. त्यांना दुसऱ्यांकडे मदत मागावी लागत आहेत. पण तरीही त्यांच्या अडचणी कमी होत नाहीत.

टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध ‘मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा’ची शुटींग देखील सध्या बंद आहे. त्यामूळे मालिकेत नटू काकाची भुमिका निभावणारे कलाकार घनश्याम नायक यांच्यावर देखील खुप वाईट परिस्थिती आली आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे.

घनश्याम गेल्या महिनाभरापासून घरी बसून आहेत. ते वाट बघत आहेत की, कधी त्यांना शुटींगसाठी परत बोलवण्यात येईल. पण त्यांना अजूनही मालिकेच्या निर्मात्यांकडून काहीही सुचना मिळालेल्या नाहीत. म्हणून घनश्याम खुप टेन्शमध्ये आले आहेत.

गेल्या एका महिन्यापासून घरी आहेत नटूकाका –

त्यांनी सध्याच्या परिस्थीतीबद्दल बोलताना एका मुलाखतीमध्ये त्यांचे दुख जाहिर केले आहे. त्यांनी सांगितले की, मी गेल्या एक महिन्यापासून घरी बसून आहे. मला काहीही माहीती नाही की, शुटींग कधी सुरु होईल. सध्या तरी शुटींगला पुर्णपणे थांबवण्यात आले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, मी मार्च महिन्यात एका एपिसोडसाठी शुटींग केली होती. त्यानंतर मी घरीच बसून आहे. मला आशा आहे की मेकर्स मला लवकरच शुटींगसाठी बोलवतील. आत्ता मालिकेत दुसऱ्या ट्रॅक सुरु आहे. म्हणून नटूकाकाला शुटींगला बोलवण्यात येत नाहीये. पण लवकरच त्यांना शुटींगला बोलवण्यात येणार आहे.

कोरोनामूळे वृद्धांना शुटींगला बोलवण्यात येत नाही –

नट्टूकाकाची भुमिका निभावणारे कलाकार घनश्याम हे वृद्ध आहेत. त्यामूळे देखील त्यांना शुटींगला जाता येत नाही. यावर घनश्याम म्हणाले की, वृद्धांसाठी हा काळ खुपच कठिण आहे. मला घरचे देखील घराच्या बाहेर जाऊ देत नाहीत. पण मी सेटवर परत जायला तरसत आहे. माझे मन आणि शरीर शुटींग करायला तयार आहे. मी वाट बघत आहे की, मला लवकर शुटींगला बोलवण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या –

लग्नाच्या १७ वर्षांनंतर आयशा झुल्काने पतीबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाली…

‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्रीची आज झालीय ‘अशी’ अवस्था; ओळखणे देखील आहे कठिण

बाॅलीवूड पुन्हा हादरले! पद्मभूषण विजेत्या बड्या संगीतकाराचे कोरोनाने निधन

गुरमीत चौधरी आणि डेबिनाचे घर आहे खुपच आलिशान आणि सुंदर; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.