बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या पारंपरिक लूकने चाहते घायाळ झाले आहेत. बॉलिवूडमधील अभिनेत्री सध्या वेर्स्टन लूकमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. पण एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींनी पारंपरिक पोशाखात वेर्स्टन टच दिलेले कपडे परिधान करून प्रसिद्धी मिळवली होती.(From Aishwarya to Priyanka, ‘This’ actresses wore sarees without wearing blouses)
यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे(Aishwarya Rai Bacchan) नाव आघाडीवर आहे. २००३ मध्ये ‘चोखेर बाली’ हा बंगाली चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने महत्वाची भूमिका केली होती. ‘चोखेर बाली’ या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने विदाउट ब्लाउज साडी नेसली होती. यामुळे त्याकाळी खळबळ माजली होती.
बंगाली डिझायनर जॉय मित्रा यांनी या चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे पोशाख डिझाइन केले होते. अभिनेत्री प्रियांका चोप्राने लग्नानंतर एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने विदाउट ब्लाउज साडी नेसली होती. ‘इनस्टाईल’ मॅगझिनसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राने हे फोटोशूट केले होते.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॅकलेस पोज दिली होती. भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राची ही साडी डिझाइन केली होती. पण चाहत्यांनी या फोटोशूटवरून अभिनेत्री प्रियांका चोप्राला प्रचंड ट्रोल केले होते. याशिवाय शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने देखील साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
यावेळी शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने विदाउट ब्लाउज साडी नेसली होती. प्रसिद्ध डिझायनर जयंती रेड्डी यांनी मीरा राजपूतसाठी ही साडी डिझाइन केली होती. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतचे साडीमधील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मौनी रॉयनेही विदाउट ब्लाउज साडी नेसली होती. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
लग्नापूर्वी अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या घराच्या टेरेसवर फोटोशूट केले होते. या फोटोमध्ये अभिनेत्री मौनी रॉयने हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसलेली दिसत आहे. यामध्ये अभिनेत्री मौनी रॉयने बॅकलेस पोज दिली होती. अभिनेत्री मौनी रॉयचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांनी अभिनेत्री मौनी रॉयच्या या फोटोंवर प्रतिक्रिया दिली होती.
महत्वाच्या बातम्या :-
तुच रे पठ्या! गर्लफ्रेंडनं ब्रेकअप केल्यानंतर तिच्याकडून वसूल केले ७ लाख, ‘असा’ शिकवला धडा
गर्लफ्रेंडवर केलेल्या खर्चाचा ठेवला हिशोब, तिने ब्रेकअप केल्यानंतर वसूल केले तब्बल ‘एवढे’ लाख
आण्णाचा नाद नाय! पोतं भरून आणली १० रुपयांची नाणी अन् खरेदी केली कार, शोरूमची उडाली दाणादाण