ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या उपचारासाठी दोघा मित्रांनी दोन दिवसात जमा केले ३० लाख

आयुष्यात आपण जेव्हा मैत्री करतो तेव्हा ती मैत्री निभावण्यासाठीच आपण एकमेकांना मदत करत असतो. आयुष्यात काही प्रसंग असे येऊन उभे राहतात की तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक पण विचारात नाही पण तेव्हा मित्र मात्र मदतीला तयार असते.

मित्र अनेक वेळा आपल्या मदतीला आल्याची अनेक उदाहरणे आज पण सांगितली जातात. पोलीस उपनिरीक्षक भाईदास कोळी यांना कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनातून बरे झाल्यावर परत त्यांना म्युकरमायकोसीस आजाराने गाठले.

या आजारासाठी त्यांना जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपये खर्च सांगण्यात आला. हा खर्च पाहून भाईदास खचून गेले. मात्र यावेळी त्यांच्या मदतीला त्यांचे मित्र धावून आले. आपला मित्र जिवंत राहावा म्हणून त्यांच्या मित्रांनी तीस लाख रुपये जमा केले.

भाईदास यांना मुंबईच्या ग्लोबस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून मित्रांनी त्यांची मदत केल्यामुळे मित्रांचे सगळीकडून कौतुक केले जात आहे.

मनमिळावू असणाऱ्या भाईदास यांची २०१५-१६ या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. ते सध्या बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव येथे सेवा बजावत आहेत. त्यांना दोन वेळा कोरोना होऊनही त्यांनी त्यातून यशस्वीपणे सामना केला.

त्यांना परत त्रास व्हायला लागल्यावर मुंबईच्या ग्लोबस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना उपचारासाठी तीस ते पस्तीस लाख रुपयांचा खर्च अंगन्यात आला. त्यांच्या आजरावरील उपचारासाठी पोलीस उपनिरीक्षक बॅचने तीस लाख रुपयांचा निधी जमा केला.

ताज्या बातम्या
तरुणीला वडिलांसाठी हवे होते ऑक्सिजन सिलिंडर; शेजाऱ्याने ठेवली घृणास्पद मागणी

एकेकाळी भाडे देण्यासाठी खिशात नव्हते पैसे, आज या अलिशान गोष्टी वापरून जगतोय राजा सारखे जीवन…

यांचा एक रूपया सुद्धा घेऊ नका, कोवीड सेंटरसाठी अमिताभ बच्चनने दिलेले २ कोटी परत करण्याची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.