..त्यावेळी माधवनच्या मागे मुलींचा ग्रुप असायचा, विश्वास नांगरे पाटलांनी सांगितले मैत्रीचे भन्नाट किस्से

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण आर माधवन आणि विश्वास नांगरे पाटील हे एकमेकांचे रूममेट होते. विश्वास नांगरे पाटलांनी त्यांच्या मन मै है विश्वास या पुस्तकात त्यांच्या मैत्रीचे भन्नाट किस्से सांगितले आहेत. आज आपण त्यातीलच काही किस्से जाणून घेणार आहोत.

विश्वास नांगरे पाटील यांनी म्हंटलं आहे की, कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक मुले यायची. त्यातच विश्वास नांगरे पाटील त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी आले. राजाराम कॉलेजमध्ये श्रीमंतांची मुले अनेक असायची. त्यामुळे चारचाकी गाड्यांची वर्दळही होती.

अकरावी बारावीला होस्टेलच्या वातावरणाचा माझ्यावर वाईट परिणाम झाला होता. पण मी निश्चय केला होता की होस्टेलमध्ये सावधान राहायचं.हॉस्टेल म्हंटल की टूकाऱ्या येतातच. वय असं असतं की अपघात होतातच.

चांगल्या वाईटची गती सारखीच असते. काही भरकटतात तर काही बेरके छुपे रुस्तम सगळ्या कासोट्यांवर तरुन उतरतात. बॉलीवूडचा सुपरस्टार झालेला माधवन मला रूमपार्टनर म्हणून ऍलोट झाला होता.

माधवन इंग्रजीमध्येच बोलायचा. खूप गबाळा आणि अस्ताव्यस्त राहायचा. त्याच्या सॉक्सचा खूप उग्र वास यायचा. रुममध्ये जायला, नको नको व्हायचं. पण मनाने स्वच्छ, आत्मविश्वासपूर्ण, देखण्या माधवनबरोबर माझी गट्टी जमली.

कॉलेजवरचा इंग्रजाळलेला मुलींचा ग्रुप माधवनच्या मागे असे. तो त्यांच्या गराड्यात अनेकदा दिसायचा, पण माधवन सभ्य विद्यार्थी होता. त्याच्या बोलण्या-वागण्यात कधीही, कोणाबद्दल नकारार्थी दृष्टिकोन दिसला नाही.

मुलींचा तो आदर करायचा. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, कँटीनमध्ये बसायचा, पण एखाद्या तेजस्वी योग्यासारखा. अनेक जणींना त्याच्या व्यक्तिमत्वाची एकतर्फी प्रेमातून भुरळ पडायची. तो कॉलेजवर वेगवेगळ्या नवनवीन संकल्पनांना अमलात आणायचा.

आम्ही दोघेही एनसीसीमध्ये होतो. तो एनसीसीच्या यूथ एक्स्चेंज प्रोग्राममधून जपानला जाऊन आला. त्याचं वक्तृत्व आणि वादविवाद कौशल्य वादातीत होतं. तो हॉस्टेलमधल्या मुलांना एकत्र करुन इंग्रजीचे उच्चार शिकवायचा.

थँक्यू बोलताना क चा अतिसूक्ष्म उच्चार कसा आवश्यक आहे ते स्पष्ट उच्चार करुन शिकवायचा. पण आमच्या ताठर झालेल्या खेडवळ जिभा वळायच्याच नाहीत. आम्ही दोघे डबलसीट सायकलवरुन मेसला जायचो.

कानावर चार इंग्रजी वाक्य पडावीत, हाच उद्देश असायचा. विकास धस नेहमी त्याची टर उडवायचा. काय रे माध्या, तुझ्या घरावरुन काय इंग्रजांचं विमान गेलं होतं का रे? माधवन अत्यंत संयमी होता. त्याने कधी विकासला उलट उत्तर दिलं नाही.

याचा अर्थ विकासला तो घाबरत होता, असा नाही. माधवनच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या, त्याची स्वप्नं उत्तुंग आणि वेगळी होती. त्याच्या आचार-विचारांमध्ये सुसंगती होती. ध्येयाची जाणीव स्पष्ट होती.

त्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमताही प्रचंड होत्या. त्याचे बाहू एवढे मजबूत आणि बळकट होते, की पंजा लढवण्याच्या शर्यतीत आमच्यापैकी एक जणही त्याच्यासमोर काही सेकंदांपेक्षा अधिक टिकायचा नाही. तरीही कोणत्याही गोष्टीमुळे माधवन चिडायचा नाही, उकसायचा नाही.

तो प्राध्यापकांच्या गळ्यातला ताईत झाला होता, अशा बऱ्याच माधवनबद्दलच्या गोष्टी विश्वास नांगरे पाटलांनी आपल्या पुस्तकात लिहिल्या आहेत. याच्यावरून कळते की दोघांची मैत्री किती घट्ट होती आणि आज दोघेही यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.

महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! वडिलांच्या पिस्तुलाने गोळी झाडून भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या
अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनूभव; म्हणाली, रूममध्ये नेऊन…
अवैध धंदे १०० टक्के बंद झालेच पाहीजेत, अन्यथा संबंधीत अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करणार
निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला धक्कादायक दावा; म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.