माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख आणि माजी मुख्यमंत्री स्व.गोपीनाथराव मुंढे यांची मैत्री ही किती घट्ट होती. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे.आज दोघेही जरी ह्या जगात नसले.तरीही त्यांच्या पुण्यातील लॉ कॉलेज मधील मैत्रीचे किस्से असो किंवा त्यांच्या करामती. ह्या संपूर्ण महाराष्ट्राला सांगून दोघांनीही वेळोवेळी पोटभर हसवलं.
दोनही मित्रांचं संपूर्ण आयुष्य हे दोन वेगळ्या पक्षात आणि दोन वेगळ्या विचारधारेत गेलं. दोघेही राजकारणात जरी असले तरी त्यांनी त्यांच्या मैत्रीत कधी राजकारणाला येऊ दिलं नाही.
दोघे दोन वेगळ्या राष्ट्रीय पक्षात असल्यामुळे कायमच सत्तेची शिदोरी त्यांच्या मैत्रीत राहिली. आणि ह्याचा फायदा त्यांनी एकूण मेकाला मोठ करण्यासाठी केलं. विलासराव सत्तेत आले की ते मुढेंना मदत करत आणि मुंढे सत्तेत आले की विलासरावांना मदत करत.
एकदा तर त्यांच्या मैत्रीची हद्दच झाली. विलासराव 1991 साली जेंव्हा संसदीय कार्य मंत्री होते. तेंव्हा त्यांनी मुंढेन साठी छगन भुजबळ यांना 13 आमदार फोडायला लावले.आणि आमदार फुटताच त्यांनी मुढेंचा हात पकडुन महाराष्ट्राच्या विरोधीपक्षनेत्याच्या खुर्चीवर बसवलं.
त्यांना त्या पदावर बसावण्याच संपूर्ण श्रेय सुध्दा विलासरावांचच. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच घडल असावं. तर काय होता तो किस्सा जाणून घेऊ.
5 डिसेंबर 1991 साली शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे १८ आमदार फोडले. आणि शिवसेना – B हा गट स्थापन केला. इकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपच. विरोधी पक्षनेता होण्यासाठीच संख्याबळ वाढल. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांनी फुटलेल्या १८ पैकी ६ आमदार परत आले. आणि परत शिवसेनेचे मनोहर जोशी हे विरोधी पक्षनेते राहतील असं निश्चितच झाल.
दुसरीकडे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंढे यांची एक बैठक झाली. देशमुख मुंढेना म्हणाले “माय डियर फ्रेंड तुम्हाला महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता व्हावं लागेल”. त्यावर मुंढे म्हणाले ते कस शक्य आहे कारण शिवसेनेचं विधानसभेतल संख्याबळ हे भाजप पेक्षा जास्त आहे. त्यावर देशमुख मुंढेना म्हणाले मी संसदीय कार्यमंत्री आहे.
“भुजबळांना काँग्रेस मध्ये कधी घ्यायच हे माझ्या हातात आहे. आणि भुजबळ यांचा गट मान्य करायचं न करायचं हे सुध्दा माझ्या हातात आहे.मी त्यांना 12 पेक्षा जास्त आमदार फोडायला सांगतो. आणि आमदार फुटाताच तुम्ही विरोधीपक्षनेता व्हा. आणि जर भुजबळांनी कमी आमदार आणले तर त्यांना काँग्रेस मध्ये घेणारच नाही. स्वतःच्या मित्राला विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी विलासराव ह्या हद्दीला जायला तयार होते आणि विलासरावांनी दिलेला शब्द पाळला.
तिकडे भुजबळ यांना सुद्धा 13 आमदार फोडण गरजेचं होतं. कारण त्यांना विरोधी पक्षनेता मनोहर जोशी यांना मोठा धक्का द्यायचा होता. कारण भुजबळांना डावलून १९८५ साली विधानसभेत ठाकरेंनी जोशी यांना विरोधीपक्षनेता केलं होतं. आता परत येऊ आपल्या स्टोरीवर.
विलासरावांच्या म्हणण्यानुसार भुजबळांनी सेनेचे 13 आमदार फोडले. आणि शिवसेनेच्या विरोधीपक्षनेत्याच संख्याबळ एका मताने कमी झालं. तेवढ्यात विधानसभेत गोंधळ सुरू झाला. आणि विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी. विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंढे यांच्या नावाची घोषणा केली.
घोषणा होताच विलासराव स्वत:च्या जागेवरून उठून लेन क्रॉस करून गोपीनाथ मुंढे यांच्या जवळ गेले. मुंढेंचा हात पकडला व त्यांना विरोधी पक्षनेते मनोहर जोशी यांच्या जागेवर नेऊन उभा केल. राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपल्या मित्रासाठी विलासरावांनी जे केलं ते कदाचित एक खरा मित्रच करू शकतो.
खऱ्या अर्थाने कृष्ण सुदामाची ही मैत्री महाराष्ट्राने देशमुख व मुंढे यांच्या रूपाने पाहिली. तुमच्या आयुष्यात अशे किती मित्र आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा.