Homeताज्या बातम्यामित्राच्या मदतीने आपल्याच बायकोवर करणार होता बलात्कार, असा झाला सनकी नवऱ्याचा पर्दाफाश

मित्राच्या मदतीने आपल्याच बायकोवर करणार होता बलात्कार, असा झाला सनकी नवऱ्याचा पर्दाफाश

एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या माणसाला आपल्या खाजगी आयष्याबद्दल एक फॅन्टसी होती. यासाठी त्या व्यक्तीने आपल्या एका सहकाऱ्याला पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी घरी आणले. आपला पती आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार आहे, हे त्या पिडीत महिलेला माहित नव्हते.

हे संपूर्ण प्रकरण सिंगापूरचे आहे. या जोडप्याच्या लग्नाला २३ वर्षे पूर्ण झाली असून त्यांना तीन मुले देखील आहेत. पण पतीने एका रात्रीत त्यांचे दीर्घ नातेसंबंध तोडले आहेत. त्याने मित्रासोबत मिळून पत्नीवर बलात्कार करण्याचा प्लॅन केला. तो खूप वेळ योग्य संधीच्या शोधात राहिला. दोन वर्षांनंतर, जेव्हा त्याच्याकडे संधी आली, तेव्हा त्याने त्याच्या ४५ वर्षीय जोडीदाराला त्याच्या घरी बोलावले.

त्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या दारूमध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. दोघे बेडरूममध्ये गेले तेव्हा त्या व्यक्तीची ४४ वर्षीय पत्नी डोळ्यावर पट्टी बांधून बेशुद्ध पडली होती. अनोळखी व्यक्तीने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करताच पत्नी शुद्धीवर आली. यामुळे घाबरून तो माणूस पळून गेला. संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिलेने पतीविरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणात सिंगापूरच्या उच्च न्यायालयाने गुरुवारी पीडितेच्या पतीला आणि त्याच्या मित्राला बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवले. पतीला आणि त्याच्या मित्राला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना पतीने यासंदर्भात सर्व माहिती दिली. पिडीत महिलेच्या पतीने सांगितले की, त्याला दुसऱ्या पुरुषाने आपल्या पत्नीसोबत सेक्स करताना पाहायचे आहे.

त्यासाठी पतीने आपल्या सहकर्मचाऱ्याला पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पतीने मित्राला आपल्या घरी बोलावले. पुरुषाने महिलेसोबत जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. अनोळखी व्यक्ती तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच महिलेला शुद्ध आली आणि तिने डोळ्याची पट्टी काढण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तो माणूस पळून गेला.

ही बाब तेव्हा उघडकीस येताच पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. १० जानेवारी २०२० रोजी आरोपींना अटक करण्यात आली. उप सरकारी वकील ची ई लिंग यांनी पत्नीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला अडीच ते साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची मागणी केली. परंतु त्यांची शिक्षा दोन ते अडीच वर्षांसाठीच ठेवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अयोध्या, मथूरा या टफ मतदारसंघातून योगींची माघार; आता ‘या’ सेफ जागेवरून निवडणूक लढणार
VIDEO: रावण दहन करणाऱ्यांवर इंदुरीकर महाराज संतापले, म्हणाले, ‘आरं तुहा बाप पेटव ना’
बाप दारूवर पैसे उडवायचा, पोराने आईसोबत बांगड्या विकल्या; आज देशातील टॉपचा IAS आहे