चिकनप्रेमीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सिंगापूरने प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या चिकनला विकण्याची परवानगी दिली आहे. अशा प्रकारे जगात पहिलीच वेळ आहे की ग्राहकांना स्वच्छ मांस उपलब्ध होणार आहे असा दावा कंपनीने केला आहे.
जेव्हा हे मांस उपलब्ध होईल तेव्हा त्याची किंमत अन्य मासाच्या किंमतीएवढीच असेल. आरोग्य पशु कल्याण आणि पर्यावरणीय स्थिती यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या चिकनला पर्याय देण्याची मागणी वाढत आहे.
प्रयोगशाळेत स्वच्छ प्राण्यांच्या स्नायूंच्या पेशींपासून मांस विकसित करण्याची जास्त उत्पादन खर्चामुळे प्राथमिक अवस्थेत आहे. सिंगापूर फूड एजन्सी यांस मान्यता देण्यापूर्वी प्रक्रिया, उत्पादन नियंत्रण आणि सुरक्षा चाचणीशी संबंधित माहितीचा आढावा घेतला आहे.
या मासांचे उत्पादन सिंगापूरमध्ये होईल. येथेच अमेरिकेत व्यापारी तत्वावर विक्री होणाऱ्या पर्यायी मूगआधारित अंड्याचे उत्पादन घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जागतिक बाजारपेठेत अनेक कंपन्या मांसाच्या बाजारपेठेत उतरण्याच्या तयारीत आहेत.
या कंपन्या प्रयोगशाळेत मासे, कोंबड्या विकसित करण्याबाबत चाचण्या करणार आहेत. अमेरिकेत मेमफिस मेटसने जपानच्या सॉफ्टबॅक ग्रुप आणि टेमेसेक यांच्या नेतृत्वाखाली करार केला आहे आणि निधी उभा केला आहे. बिल गेट्स आणि रिचर्ड ब्रॅंसन यांचा या कंपनीला पाठींबा आहे. सिंगापूरची कंपनी मिटस प्रयोगशाळेत विकसित केलेली कोळंबी विक्री करणारी पहिली कंपनी बनणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
माधुरी दीक्षितने बॉलीवूडचा खरा चेहरा आणला समोर; सांगितला ‘हा’ लाजिरवाणा प्रकार
…अन्यथा तोंडाला काळे फासण्यात येईल; बच्चू कडू यांचा मंत्र्याला इशारा