Sanjay Raut : संजय राऊत हे सध्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगाची हवा खात आहेत. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) ने ऑगस्टमध्ये अटक केले होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्यांच्या जमीनीसाठी प्रयत्न केला जात आहे. परंतु त्यांना अद्याप कोर्टाने जामीन मंजुर केला नाही.
अटक होण्याच्या आधी ते शिवसेनेचे आवाज होते. ते सतत प्रसारमाध्यमांसमोर शिवसेनेची बाजू परखड पणे मांडत. ते सोशल मिडीयावर सुद्धा आपल्या विरोधकांना धारेवर धरत. सामना दैनिकातील त्यांचा अग्रलेख नेहमीच चर्चेचा विषय ठरत. त्यात ते आपल्या पक्षाची भूमिका वाचकांसमोर मांडत.
त्यांच्या या शैलीली शिवसेनेचे कार्यकर्ते खूपच पसंत करत. पण ते तुरुंगात गेल्यापासून ठाकरे गटाकडे बाजू मांडणारा नेता राहिला नाही. जो शिवसेनेच्या शैलीत विरोधकांना उत्तर देईल. संजय राऊत यांची कमतरता ठाकरे गटाला जाणवत आहे. पण आता त्यांनी तुरुंगातून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या ठाकरे गट अडचणीत सापडला आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव पण निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी ही प्रतिक्रिया त्यांना सुनावणी साठी कोर्टात नेताना दिली.
त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. त्यांनी आणखी ही आमचे हौसले बुलंद असल्याचे सांगितले आहे. त्यांचे हावभाव ही पूर्वी सारखेच होते. त्यांनी निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवण्यावर सुद्धा भाष्य केले आहे.
ते म्हणाले, आज पर्यंतच्या इतिहासात ज्या पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. ते पक्ष भविष्यात खूप मोठे झाले. आम्ही पण भविष्यात नवीन चिन्ह आणि पक्षाचे नवीन नाव घेऊन पुन्हा जनतेपर्यंत जाऊ आणि पक्षाला जुने वैभव मिळवून देऊ.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: चाहत्याने शहनाज गिलसोबत केला मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न, भडकलेली शहनाज म्हणाली…
Shahajibapu patil : आधी म्हणले पवारांनी शिवसेना संपवली, आता म्हणतायत, पवार माझं दैवत; शहाजीबापूंचं चाललंय काय?
Sharad pawar : ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनी केली भाजप आणि शिंदे गटासोबत युती, समोर आली मोठी माहिती