मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीतील सदर बझार भागात मास्क बँक स्थापन करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला मास्कची गरज आहे, त्यांना या बँकेतून मोफत मास्क मिळणार आहे. तसेच ज्यांना मास्क दान करायचे आहेत, ते ही इथे आणून देऊ शकतात.
‘मास्क नसेल तर दोन हजार रुपये दंड आहे. गरीब कामगारांना इतका दंड भरणं शक्य होत नाही. त्यामुळे मोफत मास्क पुरवण्याच्या उद्देशाने उत्तर दिल्ली महानगर पालिका आणि दिल्ली पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानं ही मास्क बँक स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्तर दिल्लीचे महापौर जय प्रकाश यांच्या हस्ते बुधवारी या बँकेचे उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलीस आणि उत्तर दिल्ली महापालिका यांच्या सहकार्याने बारह तुती चौकात ही मास्क बँक स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनावरील लस अजूनही बाजारात आलेली नाहीये. त्यामुळे आपण सध्या मास्कच्या मदतीने घराबाहेर पडत आहोत. सुरक्षित अंतर, स्वच्छता पाळून आपण सर्वजण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत.
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईला पाकव्याप्त कश्मीर, मुंबई पोलीसांना माफीया म्हणने भाजपला मान्य आहे का?
कोरोना लस प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारने तयार केला प्लॅन; जाणून घ्या..
संजय राऊतांनी ईडी आणि सीबीआयला दिली कुत्र्याची उपमा; पहा नेमकं काय म्हणाले..