या’ योजनेतून फ्री गॅस सिलेंडर मिळण्यासाठी शेवटचे दहाच दिवस बाकी; ‘असा’ करा अर्ज

मुलुखमैदान: महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, तसेच घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करण्यासाठी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत फ्री सिलेंडर गॅस वाटप करण्यात येत आहेत.

३० सप्टेंबर २०२० ही या योजनेची अंतिम तारीख आहे. या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेण्यासाठी BPL परिवारातील कोणतीही महिला अर्ज करू शकते.

या योजनेची माहिती pmujjwalayojana.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. यावर जाऊन तु्म्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तसेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यालर होम पेजवर तुम्हाला डाऊनलोड फॉर्मचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर उज्ज्वला योजना फॉर्मवर क्लिक करा.

फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आवश्यक माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्यात तुमचे नाव, तारीख, रहिवासाची माहिती भरून तो फॉर्म तुम्हाला जवळच्या एलपीजी केंद्रात जाऊन द्यावा लागेल. कागदपत्रे व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला गॅस कनेक्शन मिळेल.

या योजनेचा लाभ २०११च्या जनगणनेमध्ये जे बीपीएल परिवार आहेत त्यांना मिळतो. आतापर्यंत एकूण ८ कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा झाला आहे. मोदी सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना १ मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती.

केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन देते. पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालय ही योजना चालवत आहे. तुम्हीदेखील या योजनेचा फायदा घ्या. लक्षात ठेवा या योजनेची फायदा घेण्यासाठी अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.