‘ही’ टेक्नीक वापरा अन् डिशच्या रिचार्जपासून मिळवा मुक्ती; फुकट पहा तब्बल १६० चॅनेल

 

टीव्ही हा आपल्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य भाग बनला आहे, माणूस फ्री असो वा कामात आधी टीव्ही लावून बसतो, पण त्यासाठी आता आपल्याला सेट टॉपबॉक्सचा रिचार्ज पण करावा लागतो, त्यामुळे काही जण वर्षाचा रिचार्ज करतात तर काही महिन्याभराचा.

अशात आता टीव्हीच्या या रिचार्जपासून मुक्तता मिळवण्याचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आता ग्राहकांना सरकारी सेट टॉपबॉक्सचा आधार घेता येणार आहे. ज्यामध्ये त्यांना कधीही रिचार्ज मारावा लागणार नाही आणि मोफत चॅनेल पण बघायला मिळणार आहे.

प्रसार भारतीच्या डीडी फ्री डिशपासून ग्राहकांना ही सेवा आता मिळू शकणार आहे. या डिशद्वारे तुम्हाला आता १६० चॅनेल मोफत पाहता येणार आहे.

डिटीएच फ्री डिश सेवा २००४ मध्ये लाँच करण्यात आली होती. ही डिश लावताना ग्राहकाला एक सेट टॉपबॉक्स मिळतो. त्यासाठी ग्राहकाला एकदाच पैसे द्यावे लागतात. एकदा पैसे दिल्यानंतर तुम्ही आयुष्यभरासाठी मोफत या सेवेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला कधीही रिचार्ज करावा लाग नाही.

या सेवेत तुम्हाला १६० वेगवेगळ्या प्रकारचे चॅनेल पाहायला मिळतात. त्यामध्ये १५ करमणूक चॅनेल, १५ मुव्ही चॅनेल, २३ रिजनल चॅनेल, ५१ एज्युकेशन चॅनेल, २४ न्यूज चॅनेल, ६ म्युजिक चॅनेल, ३ भक्ती चॅनेल आणि ३ आंतरराष्ट्रीय चॅनेल पाहायला मिळतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.