मोठी बातमी! राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरीकांना मिळणार मोफत कोरोना लस

राज्यभरात कोरोनाच्या संकाटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात वेगवेगळे निर्बंध लावले आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात आता लसीकरणालाही सुरुवात झाली आहे.

राज्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांनाही लस देण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत संभ्रम होत होता की ही लस मोफत असेल की पैसे द्यावे लागले, मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे.

तसेच लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत आहे. लसीकरणाबाबत नागरीकांना याबाबत व्यवस्थित पुर्वसुचना देण्यात येईल. त्यामुळे लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करु नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरोधात असलेली लढाई लढत आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या साहाय्याने राज्यात लसीकरण सुरु झाले. राज्यात आजपर्यंत ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या दीड कोटीपेक्षा जास्त नागरीकांना लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

लोकं मरायला लागलेत, अन् एसीमध्ये बसून नाटकं करता का? पुण्यात मनसे नगरसेवक अधिकाऱ्यांवर भडकला
मी जगलोय, आता त्या तरुणाला जगण्याची गरज; ८५ वर्षीय आजोबांनी केला ऑक्सिजन बेडचा त्याग
खाकी वर्दीला सलाम! आईच्या मृतदेहाजवळ दोन उपाशी होते बाळ, पोलिसांनी भरविला मायेचा घास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.