फ्रान्समधील कोरोनाची विदारक परिस्थिती पाहून पंतप्रधानांचा राजीनामा

पॅरिस | कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. सगळ्यात भयानक परिस्थिती पॅरिसमध्ये आहे. फ्रान्समधील कोरोनाची परिस्थिती पाहून तेथील पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी राजीनामा दिला आहे.

इम्यान्युअल मॅक्रोन यांच्या सरकारमध्ये ते मागील ३ वर्षांपासून पंतप्रधान होते. फ्रान्समधील कोरोनाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की, फ्रांसचे अध्यक्ष इम्यान्युअल मॅक्रोन हे मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या विचारात आहेत. हे फेरबदल त्यांचा खात्रीलायकपणा आणि निराश मतदारांसाची मने जिंकण्यासाठी करण्यात येणार आहेत.

कोरोना संकटकाळात एडवर्ड फिलिप यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता. या साथीत फ्रान्समध्ये २९८७५ लोकांचा बळी गेला आहे. जगात सर्वाधिक मृत्यूदर फ्रान्सचा ठरला आहे.

त्यामुळे देश आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. फ्रान्सला आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडलेला नाही. नवीन पंतप्रधानाची घोषणा झाली असून पुढील २ वर्षांसाठी फ्रान्सचे नवीन पंतप्रधान जीन कॅस्टेक्स हे असतील.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.