१५ ठिकाणी फ्रॅक्चर, ८ शस्रक्रिया तरीही हारली नाही हिंमत; पोरीने कलेक्टर होऊनच दाखवलं

प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. रात्रंदिवस अभ्यास करतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी ही परीक्षा सगळ्यात अवघड समजली जाते. प्रत्येक वर्षी कित्येक विद्यार्थी या परीक्षेस बसतात मात्र, मोजकेचं निवडले जातात.

२०१७ मध्ये अत्यंत मेहेनत करून ही परीक्षा पास होणाऱ्या उम्मूल खेर या यांच्यापैकी एक. दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये उम्मूल राहत होत्या.उम्मूलचे वडील रस्त्यावर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र झोपडपट्ट्या हटवल्यावरती त्यांचे काम सुटले. आणि पोट भरणे ही अवघड झाले.

घर चालवण्यासाठी उम्मूल स्वतः लहान मुलांच्या ट्युशन घेऊ लागल्या. यातून त्यांना फार कमी पैसे मिळत होते. अश्या अवघड परिस्थितीमध्ये घर चालवणे, ट्युशन घेणे यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नसे. उम्मूल यांना हाडाचा आजार असल्यामुळे त्याच्या १५ फ्रॅक्चर आणि ८ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

घरात शिक्षणासाठी पोषक वातावरण नव्हते यामुळे, त्यांना आठवीमध्येच शिक्षण थांबवण्यास घरून सांगितले गेले होते, मात्र उम्मूलने स्वतः कष्ट करून आपले पुढील शिक्षण सुरु ठेवले. उम्मूलची आई लहानपणी वारली होती. वडिलांनी दुसरं लग्न केले होते. दुसऱ्या आईला उम्मूचे शिक्षण घेणे पसंद नव्हते . यामुळे उम्मूलने आपले घर सोडले आणि भाड्याने घर घेऊन राहू लागल्या.

घर सोडल्यानंतर उम्मूलने मुलांच्या ट्युशन घेत आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आपल्या मास्टरच्या शिक्षणासाठी त्यांनी जेएनयू येथे प्रवेश घेतला. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपला स्पर्धा परीक्षांचा अभ्यासदेखील सुरूच ठेवला. २०१७ मध्ये उम्मूल यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशातून ४२० नंबरची रँक मिळवली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.