चार वेळा आमदार तरी रहायला पक्के घर नाही; वाचा त्या जबरदस्त आमदाराची गोष्ट

बिहार विधानसभा निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळाली. तेजस्वी यादव यांचा राजद पक्ष हा बिहारमधील सर्वात मोठा ठरला. मात्र त्यांची सत्ता येऊ शकली नाही.

नितीशकुमार यांची गेल्या १५ वर्षात सर्वात खराब कामगिरी करूनही त्यांचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. असे असले तरी सध्या सोशल मिडीयावर एका आमदाराची चर्चा आहे. ते चौथ्यांदा निवडून आले आहेत.

बलरामपूर येथील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी-लेनिनिस्टचे आमदार महबूब आलम हे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या राहणीमानासाठी सध्या ते चर्चेत आहेत. आपण अनेक आमदार बघतो ते मोठ्या बंगल्यात राहतात. त्यांच्याकडे महागड्या गाड्या असतात. मात्र हे आमदार जरा वेगळे आहेत.

मेहबूब हे अजूनही कच्च्या घरात राहतात. या घराबद्दल बोलताना त्यांनी अनेक वेळा सांगितले की, मी जनतेची सेवा करण्यासाठी आमदार बनलो आहे. त्यांची सेवा माझे प्राधान्य आहे. माझ्या सध्या राहण्याचे मला कौतुक नाही, आणि मी त्याचा प्रचारही करत नाही.

या काळात मेहबूब आलम सारखे ४-४ वेळा निवडून येणारे आमदार खरोखर आपल्यासाठी खरोखर प्रेरणा आहेत. असे आमदार सध्या देशात क्वचितच बघायला मिळतात. त्यामुळे ते सलग चारवेळा मोठ्या मताधिक्याने आमदार झाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.