शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३९ आणि १२ अपक्ष आमदार आहेत. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghdi Government) पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Four NCP MLAs will be absent from the majority test)
शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे आणि भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकार स्थापन करावे, अशी शिंदे यांच्या गटातील आमदारांची भूमिका आहे. यादरम्यान भाजपने राज्यपालांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तातडीने पावले उचलत उद्या विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.
विधानसभेच्या या विशेष अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार आमदार या बहुमत चाचणीसाठी गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आमदार सध्या मनी लॉन्ड्रींगच्या वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात आहेत.
याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अजित पवार आणि छगन भुजबळ सध्या विलगीकरणात आहेत. यामुळे अजित पवार आणि छगन भुजबळ या बहुमत चाचणीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना आणि अपक्ष मिळून ५१ आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे चार आमदार बहुमत चाचणीसाठी गैरहजर राहिल्यास महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढू शकतात. शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार उद्या सकाळी मुंबईला येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यापूर्वी शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार आज दुपारी गोव्याला जाणार आहेत.
गोव्याहुन उद्या सकाळी सर्व बंडखोर आमदार विशेष विमानाने मुंबईला येणार आहेत. शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदारांनी आज गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. देवीचे दर्शन घेतल्यानंतर सर्व बंडखोर आमदार गोव्याला जाणार आहेत. भाजप शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले पण शरद पवारांना सोडायला काही तयार नाहीत- गुलाबराव पाटील
उद्या मुंबईच येणार आणि…; एकनाथ शिंदेंची गुवाहाटीतून मोठी घोषणा
साऊथच्या सर्वात महागड्या अभिनेत्रीच्या पतीचे अचानक निधन, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त