अख्ख घरच कोरोनाने गिळलं! पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यासह घरातील चौघांचा मृत्यू

पुणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाने रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. देशात भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड, लस, ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे.

देशात कोरोना रुग्णांसाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, महापालिका अधिकारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. अशातच पुण्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. पुणे महानगरपालिकेत कचरा व्यवस्थापन विभागात अधिकारी म्हणून काम करणाऱ्या श्यामसुंदर कुचेकर यांच्यासह त्यांच्या सख्ख्या भावाचा आणि आईवडिलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

श्यामसुंदर कुचेकर हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत होते. कोरोना काळात आपली कामगिरी चोखपणे पाडली होती. मात्र काही दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्यासह कुटूंबातील आईवडील, भाऊ यांनाही कोरोनाची लागण झाली.

कोरोनावर उपचार घेत असतानाच श्यामसुंदर कुचेकर यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईचे कोरोनाने निधन झाले. आईच्या निधनानंतर काल दि २२ रोजी श्यामसुंदर आणि त्यांचा सख्खा भाऊ विजयकुमार कुचेकर यांचे निधन झाले. तसेच श्यामसुंदर यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला असल्याचं बोललं जात आहे.

कुचेकर परिवारातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांवर मोठा दु: खाचा डोंगर पसरला आहे. एकाच कुटूंबातील ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरामध्ये चिंतेची लाट पसरली आहे.

दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, नागपुर, यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाने भयानक रुप धारण केले आहे. पुण्यात गेल्या २४ तासात ९,८४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
वडीलांसह शेतात मेहनत करताना दिसला चिमुकला तैमूर, पाहा बापलेकाचे शेतातील भन्नाट फोटो
कोरोना झालाय.? घाबरू नका, १०५ वर्षीय आजोबाही झालेत बरे, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या
साजन, राजा हिंदूस्थानीसारख्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या प्रसिद्ध संगीतकाराचे निधन; बाॅलीवूडवर शोककळा
“दोन कानाखाली लावेल”; आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या मुलाला भाजप खासदाराची धमकी

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.