महाराष्ट्राचे चार ऑक्सिजन टँकर गुजरातला पळवण्याचा प्रयत्न; शोध मोहिमेत धक्कादायक माहिती उघड

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सचा तुडवडा निर्माण होत आहे. त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारला ऑक्सिजनची मागणी करत आहे.

अशा सर्व परिस्थितीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनचे चार टँकर नागपुरच्या ऐवजी गुजरातला नेण्यात येत होते, मात्र हा प्लॅन फसला असून त्या चारही टँकरांना अडवण्यात आले आहे.

उद्योगपती प्यारे खान यांनी नागपुरला ऑक्सिजन मिळावे यासाठी बराच प्रयत्न करत होते. त्यामुळे ठिकाणठिकाणहून नागपुरसाठी ऑक्सिजन टँकर रवाना करण्यात येत होते. अशात नागपुरसाठी काही टँकर रवाना झाले होते, पण पोहचले नव्हते. त्यामुळे प्यारे खान यांनी याबाबत शोध मोहीम सुरु केली होती.

प्यार खान यांनी यासाठी प्रशासनाचीही मदत घेतली होती. त्यानंतर या शोध मोहिमेत असे चार पैकी दोन टँकर गोंदियाच्या देवरी या ठिकाणी सापडले आहे, तर दोन टँकर नागपुरच्या पुढे जाऊन औरंगाबाद येथे पोहचले होते.

हे चारही टँकर अहमदाबादला जात होते, अशी माहिती मिळत आहे. यासाठी जास्तीचे पैसे देऊन नागपुरचे ऑक्सिजन औरंगाबाद नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र प्यार लाल यांच्या शोध मोहिमेमुळे त्या चारही टँकरांना अडवण्यात आले आहे. त्यामुळे आता दोन टँकर आता नागपुरला पोहचले असून दोन टँकर आता नागपुरच्या मार्गावर आहे.

दरम्यान, राज्यभरात ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत महराष्ट्राचा ऑक्सिजन गुजरातला पळवून नेण्याची ही धक्कादायक घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

गर्दी केल्याने जाब विचारणाऱ्या पोलिसाला जमावाची पाठलाग करुन जबर मारहाण; पहा व्हिडीओ
जास्मीन भसीनने अशी केली आत्महत्येच्या विचारांवर मात; जाणून घ्या तिच्या कठीण प्रसंगांविषयी
‘त्या’ दिवसापासून शिवसेनेचे कट्टर समर्थक नारायण राणे शिवसेनेचे कट्टर विरोधक बनले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.