भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

दिल्ली । भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरवरून स्वतः याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान प्रणब मुखर्जी हे काही वेगळ्या कारणांसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेव्हा कोरोनची चाचणी दरम्यान त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

त्यांनी ट्वीटरवरून याची माहिती देताना आठवडाभरात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील केले आहे.

प्रणब मुखर्जी हे 84 वर्षीय आहेत. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सेल्फ़ आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या देखील समावेश आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.