Share

शिंदेगटात जाताच माजी मंत्री सावंतांनी फोडलं ठाकरेंचं ‘ते’ गुप्त पत्र; सगळंच काढलं बाहेर

मुंबई : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ठाकरे गटाला कायमचा रामराम ठोकला आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. मुंबईतील बाळासाहेब भवनात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला भरपूर काही दिले दिले. मात्र गेल्या तीन वर्षांत त्यांनी मला बळजबरीने निवृत्त केले. दीपक सावंत हसत हसत म्हणाले की, मला मंत्रीपद नको, मला काम हवे आहे. यावेळी काम करण्याची इच्छा असलेल्या कार्यकर्त्याला रोखू शकत नाही असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्याकडून दिपक सावंत यांचे स्वागत करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप काही दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मला खूप काही दिले. त्यांचे खूप खूप आभार. पण गेल्या तीन वर्षांपासून मला काहीच काम दिले जात नव्हते. मला काम करायचं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मला काम मिळेल.

मला मंत्री व्हायचे नाही. मला काम हवे आहे, मला काम द्या असे ऑनलाइन पत्र मी उद्धव साहेबांना दिले होते” असे दीपक सावंत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली. माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी पालघर, मेळघाट, खेड्यात-पाड्यात जावुन या दुर्गम भागासह राज्यातील इतर जिल्ह्यांतील कुपोषण कमी करण्याचे काम केले. त्याचा परिणाम आताही दिसून येतो.

टेलिमेडिसिन ही संकल्पना त्यांची होती. दुर्गम भागातच उपचार व्हायला हवेत, या ध्येयाचा ध्यास त्यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, शासकीय रुग्णालयातील समस्या व प्रश्न सोडविण्याचे व त्यासाठी मार्गदर्शन करण्याचे चांगले काम दिपक सावंत यांनी केले आहे. आरोग्यमंत्री असतानाही दीपक सावंत यांनी त्यांच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यभरातील सर्वसामान्य रुग्ण आणि नागरिकांची मोठी सेवा केली.

दीपक सावंत हे कमी बोलतात पण काम खूप करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही पुढे जात आहोत. राज्य सरकारने गेल्या सहा-सात महिन्यांत केलेली कामे त्यांनी जवळून पाहिली आहेत. त्यांनाही काम करायला आवडते. ही आवड कोणीही रोखू शकत नाही. दीपक सावंत हे बाळासाहेबांचे खास डॉक्टरही होते.

त्याच्यासोबत काम करणे हा एक विशेष सन्मान आहे. त्यांला काम करायचे होते तरी दुर्दैवाने त्यांना काम थांबवावे लागले. त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात आली. पण कृतीशील माणूस थांबू शकत नाही”, असेही मुख्यमंत्री एकनाश शिंदे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

शिंदेगटात जाताच माजी मंत्री दिपक सावंत भावूक; म्हणाले उद्धवसाहेबांनी मला खूप काही दिलं, पण….
बंगळुरूमध्ये भीषण अपघात, बसमध्ये झोपलेल्या कंडक्टरचा अचानक आग लागल्याने मृत्यू
मेडीक्लेमसाठी २४ तास हाॅस्पीटलमध्ये ॲडमिट असणं आवश्यक नाही, ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now