Anil Deshmukh : नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जमीन मंजूर झाल्याची बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून कारागृहात असलेल्या अनिल देशमुखांना अखेर जमीन मिळाला आहे. त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानण्यात येत आहे.
अनिल देशमुख यांना कथित मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आर्थर रोड कारागृहात होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. आज न्यायालयाने अनिल देशमुखांचा हा अर्ज मान्य केला आहे.
१०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी त्यांना २ नोव्हेंबरला ईडीकडून अटक झाली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते. आता जवळपास ११ महिन्यांनी त्यांना जमीन मजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा दिलासा मानण्यात येत आहे.
१ लाखाचा बॉंड भरण्याच्या अटीवर त्यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुखांनी पासपोर्ट जमा करावा, असे कोर्टाने सांगितले आहे. तसेच त्यांनी तपासात हस्तक्षेप करू नये आणि पुढील तपासात त्यांनी सहकार्य करावे अशा अटीही देण्यात आल्या आहेत.
मात्र, अनिल देशमुख यांच्यावर ईडी आणि सीबीआय असे दोन गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये जोपर्यंत त्यांना जमीन मिळत नाही तोपर्यंत ते तुरुंगातून बाहेर येऊ शकत नाही. दरम्यान, आता ईडीच्या गुन्ह्यात त्यांना दिलासा मिळाले आहे. सीबीआयच्या गुन्ह्यातही त्यांना जमीन मिळावा यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे.
यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, अनिल देशमुखांना जामीन मिळाल्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सत्यमेव जयते असे म्हणत त्यांनी न्यायालयाचे आभारही मानले आहे. संजय राऊत यांनाही लवकरच जमीन मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
महाविकास आघाडीला महा झटका : अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही
अनिल देशमुखांची जप्त केलेली संपत्ती परत करा; कोर्टाने आदेश देत ईडीलाच फटकारले
अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारत दिले ‘हे’ आदेश
अनिल देशमुखांच्या १०० कोटी वसुली प्रकरणला वेगळं वळण, देशमुखांना मिळणार क्लीन चीट