Share

Kate Kniveton : झोपेत शरीर संबंध ठेवायचा नंतर लाथ मारून बेडवरून ढकलायचा.. माजी महिला खासदाराचे धक्कादायक आरोप, नवजात बाळालाही दिला त्रास

Kate Kniveton : ब्रिटनमधील (Britain) माजी महिला खासदार केट नाइवेटन (Kate Kniveton) यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील दु:खद आणि अत्याचाराने भरलेल्या अनुभवांची सत्य कहाणी उघड केली आहे. त्यांनी आपल्या माजी नवऱ्यावर अँड्र्यू ग्रिफिथ्स (Andrew Griffiths) यांच्यावर मानसिक, लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप करत संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.

झोपेत करत असे लैंगिक अत्याचार

केट यांनी स्पष्टपणे सांगितलं की अँड्र्यू अनेकदा ती झोपेत असताना तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवायचा. “मला जाग आली की तो आधीच शरीरसंबंध करत असायचा. कधी मी गप्प राहायचे, पण कित्येक वेळा मला रडू यायचं. त्याने माझ्या रडण्याकडे दुर्लक्ष करून मला बेडवरून लाथ मारून खाली फेकलं,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

सर्वांना वाटायचं की आमचं नातं आदर्श आहे

२०१३ साली दोघांचं लग्न झालं. बाहेरून अँड्र्यू अत्यंत मोहक आणि लोकांना आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व असलेला नेता वाटायचा. पण घरात मात्र तो पूर्णपणे वेगळा होता. त्याच्या रागीट स्वभावामुळे केटला अनेक वेळा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला.

“कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही”

अँड्र्यू वारंवार केटला धमकी द्यायचा, “मी इथला खासदार आहे, पोलिस माझ्यावर विश्वास ठेवतात, तुझ्यावर नाही.” केटने सांगितलं की या धमक्यांमुळे तिने बराच काळ गप्प राहणंच पसंत केलं.

सगळ्यात त्रासदायक क्षण तेव्हा आला, जेव्हा तिच्या दोन आठवड्यांच्या बाळावर अँड्र्यूने संतापाने ओरडायला सुरुवात केली. दुधासाठी रडणाऱ्या त्या चिमुकल्यावर केलेला राग पाहून केट हादरून गेली. त्याच दिवशी तिनं निर्णय घेतला की आता तिने हे सर्व सहन करू नये, आणि तिने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

२०१८ मध्ये दोघं वेगळे झाले आणि नंतर केटने २०१९ ते २०२४ या काळात बर्टन (Burton) मतदारसंघातून खासदार म्हणून काम पाहिलं. आता ती स्वतःच्या अनुभवांवर आधारित जनजागृती करत आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now