“माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना भाजपकडून मुख्यमंत्री पदाचे तिकीट मिळणार”

गुवाहाटी | पुढील वर्षी आसाम येथे विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे तिकीट मिळणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला आहे.

भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे आसाम राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असू शकतात, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते तरुण गोगोई यांनी केला आहे.

मला काही सूत्रांनी माहिती दिली आहे की, रंजन गोगोई यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये आहे. कदाचित त्यांना आसामचे पुढील मुख्यमंत्री म्हणूनही पुढे केले जाऊ शकते, असे तरुण गोगोई यांनी म्हटले आहे.

तसेच जर माजी सरन्यायाधीश राज्यसभेवर जाऊ शकतात. तर ते भाजपकडून मुख्यमंत्री पदाची निवडणूकही लढवू शकतात, असे तरुण गोगोई यांनी म्हटले आहे.

हे सगळे राजकारण आहे. राम मंदिराच्या निर्णयावरून भाजप रंजन गोगोई यांच्यावर खुश आहे. ते राज्यसभेच्या मार्गाने राजकारणात प्रवेश करू शकतात. ते या पदाला नाकारू शकत होते, पण त्यांनी राजकीय महत्वकांक्षेमुळे राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला, असेही तरुण गोगोई यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.