गॅंगस्टर गजा मारणेला मदत केल्याप्रकरणी पुण्यातील भाजपच्या माजी खासदाराला अटक

पुणे | मुंबईतील तळोजा जेलमधून सुटका झाल्यानंतर भव्य रॅली काढून दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांनी अटक केली होती. गजा मारणे अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून त्याला अटक करत जेलमध्ये रवानगी केली. सध्या गजा मारणे नागपुर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

गजा मारणेने त्याच्या समर्थकांसह पुणे मुंबई महामार्गावर धुडघूस घातला होता. पोलिसांची डोके दुखी बनलेलल्या गजाचे साम्राज्य उध्वस्त करण्याचे पोलिसांनी ठरवलं. गजाच्या रॅलीमध्ये राजकीय पक्षांचे नेते सहभागी होते. त्यानंतर पोलिसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली होती.

आता पुणे पोलिसांनी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक केली आहे. गजा मारणे रॅली  प्रकरण त्यांना अंगलट येणार असल्याची शक्यता आहे. संजय काकडे यांच्या मालकीच्या आलिशान कार गजाच्या रॅलीच्या ताफ्यात होत्या असं समोर येत आहे.

पुण्यातील मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ माजली आहे. आज दुपारी संजय काकडे यांना शिवाजी नगर कोर्टात हजर केले जाणार आहे.

संजय काकडे हे भाजपचे नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून ते नावारूपाला आले आहेत. २०१४ मध्ये ते राज्यसभेचे खासदार होते.
गेल्या काही दिवसांपासून  ते भाजपमधील अंतर्गत वादामुळे नाराज असल्याचं समोर येत होतं.

काय आहे प्रकरण-
टोळीयुध्दातून विरोधी गटातील दोघांचा खून केल्याप्रकरणी गेल्या सहा वर्षापासून मुंबईतील तळोजा जेलमध्ये कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली होती. त्याच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुणे तब्बल दिडशे किलोमीटर गाड्यांची रॅली काढली होती .

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात गेल्या ६ वर्षांपासून गजा मारणे तुरूंगात होता. त्याची दहशत इतकी होती की त्याच्याविरोधात बोलायलाही कोणी समोर येत नव्हतं. अखेर त्याची निर्दोष सुटका झाली आणि तो जेलबाहेर आला. गजा मारणे सुटणार असं समजताच त्याच्या समर्थकांनी थेट मुंबईतील तळोजा जेल गाठलं.

गजा बाहेर येताच त्याच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष केला होता.  गजा मारणेच्या रॅलीचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच या गुंडांना पोलिसांचं भयचं उरलं नसल्याचं बोललं जात होतं. अखेर पुणे पोलिसांनी गजाच्या अनेक समर्थकांना आणि रॅलीशी संबंध असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“लोकसंख्या वाढत असल्यामुळे लोक मरताय, तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात टाका”
शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यातील दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीबाबत घेतला ‘हा’ निर्णय
टीक टॉक स्टारने १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची देत होता धमकी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.