देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांवर आली भयानक वेळ; कोरोनाच्या उपचारासाठी मिळत नाहीये आरोग्य सुविधा

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसभरात लाखोंच्या संख्येने रुग्ण भेटत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, बेड्स, औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे.

अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे अनेक रुग्णांचा मृत्यु होत आहे. असे असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाच्या या संकटात माजी सैनिकांनाही आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे.

एकीकडे पश्चिम उत्तर प्रदेशात सब-एरीया मुख्यालयकडून कर्नल आणि माजी सैनिकांच्या संघटनांकडून माजी सैनिकांना आरोग्ये सेवा पुरवण्याचे निर्देश दिले आहे, तर दुसरीकडे नोएडामध्ये माजी सैनिकांना कोरोनावर उपचार घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

लष्कराने आपल्या सर्व युनिट बटालियनला माजी सैनिकांची सध्याची प्रकृती जाणून घेण्याचे निर्देश दिले आहे. तसेच लष्कर माजी सैनिकांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करत आहे.

असे असतानाही माजी सैनिकांचे म्हणणे आहे की, त्यांना कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा मिळत नाही, तसेच त्यासाठी त्यांना कोरोनावरील उपचार मिळवण्यासाठी खुप धडपड करावी लागत आहे.

सगळ्यात जास्त अडचणींचा सामना तर त्या माजी सैनिकांना करावा लागत आहे, जे एकटे राहत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली, असेल तर त्यांची सेवा करायलाही कोणी नाहीये.

माजी सैनिकांच्या उपचारासाठी कुठल्याही मदत केली जात नसल्याचे माजी सैनिकांनी म्हटले आहे. तर कोरोना संक्रमित झालेल्या माजी सैनिक घरीच क्वारंटाईन होत असून त्यांच्या मदतीला परिसरातील नागरीक धावून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, केंद्र सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीय; न्यायालयाने झापले
कंगणा राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीला झाला आनंद; म्हणाली…
मिसेस कोहली बनण्यापूर्वी अनूष्का शर्माचे होते अनेक अफेअर्स; नाव वाचून धक्काच बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.