याला म्हणतात खरे प्रेम! आवडत्या हत्तीच्या मृत्यूनंतर फॉरेस्ट रेंजर ढसाढसा रडला, पहा व्हिडिओ

असे अनेक लोक आहेत जे माणसांपेक्षा प्राण्यांवर जास्त प्रेम करतात. त्यांना माणसांपेक्षा प्राण्यावर जास्त भरोसा असतो. आणि हे बरोबरच आहे एक वेळेस माणूस विश्वासघात करेल पण प्राणी कधीच विश्वासघात करणार नाहीत ते इमानदार असतात.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुत्रा. पण जर अचानक आपल्या आवडत्या प्राण्याचा मृत्यू झाला तर? हे दुःख तोच समजू शकतो ज्याच्या जवळचा मित्र म्हणजे पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर सध्या अशाच एका प्राणीप्रेमीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

तामिळनाडूमध्ये एक फॉरेस्ट रेंजर आपल्या खूप जवळच्या हत्तीच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडला. या जखमी हत्तीला उपचारासाठी मृदूमलाई टायगर रिझर्वमध्ये आणले होते. त्याची देखभाल संबधीत अधिकाऱ्याने केली होती.

हत्तीला वाचवण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले पण जखमी हत्तीला ते वाचवू शकले नाही. मृत्यूनंतर हत्तीला अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जात होते तेव्हाच फॉरेस्ट रेंजर हत्तीच्या सोंडेल कुरवाळत असताना दिसतो.

तो इतका भावनिक होतो की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. भारतीय वन सेवेतील अधिकारी रमेश पांडे यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की तमिळनाडूमधील मृदुमलाई टायगर रिझर्वमध्ये सदा विलाई एलिफंट कॅम्पमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी जड अंतःकरणाने एका हत्तीला निरोप दिला.

हे पाहणं खूप भावनिक आहे असेही ते म्हणाले. ट्विटरवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण भावनिक झाले आहेत. फॉरेस्ट असोसिएशन म्हणाले की काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. नजरेतून कदाचित हे सुटू शकतं पण हृदयातून हे सुटू शकत नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.