काय सांगता! या मातब्बर कार कंपनीने ठोकला भारताला राम राम, तोट्यात जात होत्या या कंपनीच्या गाड्या

जगातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनींपैकी एक असलेल्या फोर्ड मोटर या कंपनीने भारतातील आपले दोन्ही मनुफॅक्चरींग प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला असून कंपनी भारतातून आपला गाशा गुंडाळणार आहे.

वाढत चाललेल्या तोट्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले. फोर्डच्या कारची विक्री ही अपेक्षेप्रमाणे होत नसून भारतीय बाजारात ग्राहक फोर्डकडे कानाडोळा करतानाचे दिसून आले आहे.

देशातील टॉप १० ऑटोमोबाईल कंपनीमध्ये फोर्ड ९ व्या स्थानावर असून ऑटोमोबाईल क्षेत्रात फोर्डचा मार्केट शेअर केवळ १.५७ टक्के होता. १९९० मध्ये फोर्ड मोटरने भारतात आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली खरी मात्र २ दशके होऊन देखील कंपनीला हवे तेवढे यश मिळवता आले नाही.

कंपनीला मागील १० वर्षात २ बिलियन डॉलर्सच्या आसपास तोटा झाला आहे. असे असले तरी फोर्ड कंपनी तिच्या काही कार आयात करुन भारतात विक्री करणार आहे. त्यामुळे फोर्ड कार्सच्या चाहत्यांसाठी ही थोडी दिलासादायक बातमी आहे.

भारतात फोर्ड कंपनी फिगो (Ford figo), एस्पायर (Ford Aspire), फ्रीस्टाईल (ford freestyle), इकोस्पोर्ट (Eco Sports) आणि एन्डेव्हर (ford endeavour) मॉडेल्सची विक्री करते. जनरल मोटर्स आणि हार्ले डेविडसन सारख्या मातब्बर कंपन्यांनी देखील भारतातील सगळा गाशा गुंडाळला असून भारताला राम राम ठोकला आहे.

भारतासारख्या विकसनशील देशांमधून अश्या प्रकारे विदेशी ऑटोमोबाईल कंपनीने काढता पाय घेणे हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने नक्कीच सकारात्मक नाही. मात्र भारतीय बाजारपेठ बघता भारतात आपले पाय रोवण्यासाठी ऑटोमोबाईल कंपनीना अनेक प्रतिस्पर्धी भारतात आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
विद्यार्थीनीचे कपडे पाहून मुख्यधापक संतापला! म्हणाला, अशा कपड्यांमुळेच मुलं बिघडतात
अनिल अंबानींनी दिल्ली मेट्रोविरोधातील खटला जिंकला; कंपनीला मिळणार ४६ अब्ज रुपये
‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए….’ निकालानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज
मुंबई इंडियन्सची हवा! वर्ल्डकपसाठी टिम इंडीयात मुंबई इंडियन्सच्या तब्बल ६ खेळाडूंची निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.