बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी रिमा लागूने सोडली होती बॅंकेतील नोकरी

बॉलीवूडमध्ये मॉर्डन आईची भुमिका निभावून रिमा लागूने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. आज त्या आपल्यामध्ये येत नसल्या तरी त्यांच्या भुमिका आणि चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घरात करुन राहतात. एकदा नाही तर अनेकदा त्यांनी आईची भुमिका निभावली होती.

बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध आईची भुमिका निभावणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रिमा लागूचे नाव सर्वात पहिले येते. त्यांच्या करिअरच्या सुरवातीला त्यांनी आईची भुमिका निभावली होती. त्यानंतर आईच्या भुमिकांसाठी ओळखले जाते.

सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार यांसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या आईच्या भुमिका त्यांनी निभावल्या आहेत. सात वर्षे छोट्या असणाऱ्या अभिनेत्याच्या आईची भुमिका देखील त्यांनी निभावली आहे.

रिमा लागु यांना सलमान खानची आई म्हणून खुप जास्त प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. पण २०१७ मध्ये त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमूळे सर्वांना धक्का बसला होता.

रिमा लागू यांचा जन्म २१ जुन १९५५ साली झाला होता. त्यांचे खरे नाव नयन भडभडे होते. पण लग्नानंतर त्यांनी नावात बदल केला. त्यांनी त्यांचे सगळे शिक्षण पुण्यातून पुर्ण केले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर रिमाने बॅंकेत नोकरी करायला सुरुवात केली होती.

कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. अभिनयात करिअर करण्यासाठी रिमाने बॅंकेतील नोकरी सोडली होती. अभिनयासाठी त्यांनी चांगल्या नोकरीला नकार दिला होता.

नाटकांमध्ये काम करण्याच्या वेळेस त्यांची ओळख विवेक लागूसोबत झाली होती. मैत्रीच्या काही दिवसांनंतरच रिमा आणि विवेकने लग्न केले होते. लग्नानंतर त्यांनी त्यांचे नाव नयन सोडून रिमा केले होते.

त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नसले तरी त्या खुप आनंदी होत्या. काही वर्षांनंतर दोघे वेगळे झाले होते. रिमा आणि विवेक लागूला एक मुलगी आहे. घटस्फोटानंतर रिमाने एकटीनेच त्यांच्या मुलीचा सांभाळ केला होता.

लग्न तुटल्यानंतर रिमाने बॉलीवूडमध्ये करिअर करायला सुरुवात केली. काही वर्षांमध्ये रिमाने इंडस्ट्रीने चांगलेच नाव कमावले आहे. इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध आईच्या भुमिका निभावणाऱ्या अभिनेत्रींमध्ये त्यांचे नाव येते.

रिमाने बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या भुमिका केल्या. त्यासोबतच त्या टेलिव्हिजनवर देखील चांगले काम करत होत्या. पण त्यांना सर्वात जास्त पसंत आईच्या भुमिकेसाठी केले गेले. आजही लोकं त्यांच्या भुमिकेच्या आठवणी काढत असतात.

महत्वाच्या बातम्या –
११ अफेअर्सनंतर २०१० मध्ये मनीषा कोईरालाने केले होते नेपाली बिजनेस मॅनसोबत लग्न; दोन वर्षात झाले वेगळे
‘खिलाडिंयो का खिलाडी’ चित्रपटाला झाली २५ वर्ष पुर्ण; सेटवर सुरु झाली होती अक्षय आणि रेखाची प्रेम कहाणी
खलनायक नाही तर नायक बनण्यासाठी बॉलीवूडमध्ये आले होते प्रेम चोप्रा
सुपरस्टार असूनही सनी देओलसोबत काम करायला काजोलने दिला होता नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.