शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! देशात पहिल्यांदाच सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर होणार लॉन्च

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सीएनजी ट्रॅक्टर लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत्या इंधन दरवाढीपासून शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. या कार्यक्रमात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रस्ते विकास व महामार्गमंत्री व्ही.के सिंह उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे की सीएनजीवरील वाहने हे उद्याच भविष्य आहे. जगभरात १.२ दशलक्ष वाहने नैसर्गिक वायूवर चालवली जातात. बऱ्याच कंपन्या आणि महानगरपालिका त्यांच्या ताफ्यात सीएनजी वाहने जोडत आहेत.

सीएनजी ट्रॅक्टरचे फायदे

यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. सीएनजी ट्रॅक्टरमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होणार आहे. सीएनजी ट्रॅक्टर पुर्णपणे सुरक्षित बनवण्यात आला आहे. याचे आयुष्य डिझेल ट्रॅक्टरपेक्षा जास्त असणार आहे. सीएनजी ट्रॅक्टरचे मायलेजही चांगले असणार आहे. याचा देखभाल खर्चही कमी होणार आहे.

डिझेलच्या किंमती नेहमी कमी जास्त होतं असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेलवरील ट्रॅक्टर परवडण्याजोगे नव्हते. सीएनजीचे दर कमी जास्त होत नाहीत झाले तरीही त्याचा फरक पडत नाही. त्यामुळे या ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं दिसत आहे.
म्हत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये घेतलेल्या अर्जून तेंडूलकरला मुंबईच्या टिममधून दिला डच्चू
‘काहीही करा पण जालिंदरदादांना बरं करा’, कोण आहेत ते ज्यासाठी अजितदादांचा जीव तळमळला
विराट-अनुष्काच्या लेकीला बॉलीवूड कलाकारांनी दिले महागडे गिफ्ट, वाचून डोळे फिरतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.