युपी बिहार लुटण्याच्या चक्करमध्ये कोर्टात पोहोचले होते शिल्पा शेट्टी आणि गोविंदा

बॉलीवूड अभिनेते गोविंदा त्यांच्या वेगळ्या डान्ससाठी खुप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अभिनयाचे आणि डान्सचे लाखो दिवाने आजही आहेत. आजच्या घडीला देखील लोकं खुप आवडीने त्यांचे चित्रपट पाहतात.

९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये गोविंदाचे वर्चस्व होते. त्यांचे चित्रपट सुपरहिट व्हायचे. चित्रपटांपेक्षा जास्त त्या चित्रपटातील गाणी हिट व्हायची. त्यांचे प्रत्येक एक गाण हिट असायचे. पण याच गाण्यामुळे गोविंदा एकदा जेलमध्ये जाता जाता वाचले. वाचा पुर्ण किस्सा.

हा किस्सा आहे ९० च्या दशकातील. गोविंदा ‘छोटे सरकार’ चित्रपटात काम करत होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत शिल्पा शेट्टी मुख्य भुमिकेत काम करत होती. चित्रपटाची शुटींग सुरू झाली. गोविंदाला त्यांच्या दुसऱ्या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटात देखील हिट गाणी हवी होती.

त्यांनी निर्मात्यांना याबद्दल सांगितले होते. निर्मात्यांनी चित्रपटासाठी खास एका गाण्याची तयारी केली. हे गाणं गोविंदा आणि शिल्पा शेट्टीवर चित्रित करण्यात आले होते. ‘एक चुम्मा तु मुझको उधार दे दे…असे गाण्याचे बोल होते.

हे गाणं ऑल टाईम हिट झाले. पण या गाण्यामूळे शिल्पा आणि गोविंदा मात्र चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यांना कोर्टात जाण्याची वेळ आली होती. कारण गाण्यात अनेक शब्द असे होते जे लोकांना आवडले नव्हते.

गाण्यात युपी बिहारचा देखील उल्लेख होता. त्यामुळे बिहारच्या लोकांना हे गाणं आवडल नाही. लोकांनी या गाण्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यामुळे गोविंदा आणि शिल्पावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार होती.

२००१ मध्ये हे प्रकरण कोर्टात गेले आणि मोठी अडचण निर्माण झाली. पण कोर्टाने या प्रकरणात गोविंदा आणि शिल्पाला निर्दोष ठरवले. कारण अभिनेते आणि अभिनेत्रीवर काही नियम लागू होत नाहीत.

त्यांच्या चित्रपटातील गाणी आणि सीन्स पाहणे हे सेन्सॉर बोर्डाचे काम आहे. त्यात कोर्टा हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून गोविंदा आणि शिल्पा वाचले. नाही तर दोघांना अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडावी लागली असती.

महत्त्वाच्या बातम्या –

१५०० रुपयांमध्ये विकली जात होती सैफीची बहीण सोहाची ती घाणेरडी सीडी; वाचा पुर्ण किस्सा

..म्हणून राजेश खन्नाने स्वतःचे चित्रपट पाहणे बंद केले होते

राजेश खन्नाच्या ‘त्या’ सल्ल्यावर डिंपल कपाडियाला झाले होते हसू अनावर; वाचा पुर्ण किस्सा

निर्मात्याने अंकिता लोखंडेकडे केली नको ती मागणी; तिचे उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.