५० रूपयांच्या पेट्रोलसाठी मोजावे लागतायत ११३.१२ रूपये, या दरवाढीला जबाबदार कोण?

मुंबई | एकीकडे कोरोना महामारीच्या संकटामुळे हैराण झलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ बसत आहे. लागोपाठ चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. त्यामुळे आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 107.24 रुपये तर डिझेलचे दर 95.97 रुपये प्रतिलिटर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 113.12 रुपये तर डिझेलचा दर 104.00 रुपये प्रतिलिटर आहे.

देशातील सर्व मोठ्या महानगरांपैकी पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमती क्रमशः 107.78 रुपये प्रति लिटर आणि 104.22 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 99.08 रुपये प्रति लिटर आणि 100.25 रुपये प्रति लिटर आहे.

इंधनाचे दर प्रथमच मोठ्या प्रमाणावर वाढले असून शेती मशागत महागली असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची परिवहन व्यवस्थाही कोलमडली आहे. यातच सर्वसामान्यांना एसटीचा प्रवास ही महागला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने टॅक्‍स कमी करावा, अशी मागणी विविध राज्यांनी केली आहे. ऑक्‍टोबर 2020 पासून राज्यातील इंधनाचे दर 23 ते 25 रुपयांनी वाढले आहेत.

चीन, रशिया, जपान यासह अन्य देशांमध्ये इंधनाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात इंधनात आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. इंधन हे जीएसटीत आणल्यास दर नियंत्रणात राहतील, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तर केंद्राने इंधनावरील टॅक्‍स कमी केल्यास दर कमी होतील, अस मत राज्य सरकारने मांडले आहे. इंधनावरील टॅक्‍स कमी करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार पाऊल मागे घेत नाहीये त्यामुळे सर्वसामान्य लोकांना महागाईला तोंड द्यावं लागत आहे.

इंधन विक्रीतून राज्य सरकारला 25 हजार कोटी रुपये मिळतात आणि केंद्र सरकारलाही 30 हजार कोटी रुपये मिळतात. जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. पेट्रोलवर राज्य सरकारचा 21 रुपये 28 पैशांचा टॅक्‍स असून विक्रेत्यांना 3 रुपये 68 पैशांचे कमिशन दिले जाते.

दुसरीकडे पेट्रोलवर केंद्राचा 32 रुपये 90 पैशांचा टॅक्‍स आहे. डिझेलवर राज्य सरकारचा 21 रुपये 28 पैशांचा तर केंद्राचा 31 रुपये 80 पैशांचा टॅक्‍स असून विक्रेत्यांना दोन रुपये 58 पैशांचे कमिशन दिले जाते. त्यामुळे इंधनाचे खर्च वाढत असल्याने शेती मशागतीसह अन्य बाबींमध्येही महागाई वाढली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.