रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी गणपती बाप्पाचे मोदक खुप फायदेशीर आहेत; जाणून घ्या कसे

गणेश चतुर्थी आहे. आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा आले म्हटल्यावर मोदक तर सर्वांच्या घरी असतील.

मोदक ही एक अशी गोष्ट आहे जी गणपती बाप्पाला सर्वात जास्त आवडते. मोदक गणेश चतुर्थीनिमित्त प्रसाद म्हणून अर्पण केले जाते. बाप्पालाच नाही तर आपल्या सर्वांना पण मोदक खुपच आवडतात.

पण तुम्हाला माहिती आहे का? हे मोदक आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहेत. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण गणेशाचा आवडता मोदक खाण्याने आरोग्याचे बरेच फायदे होऊ शकतात.

चला तर मग जाणून घेऊया नक्की काय फायदे आहेत मोदक खाण्याचे.

जर तुम्ही घरी गूळ, नारळ आणि तांदळाचे पीठ वापरुन स्टीम मोदक बनवले. तर त्याचे अनेक फायदे होतात. याला आपण उकडीचे मोदक म्हणतो. हे मोदक आरोग्याच्या विविध समस्यांसाठी उपयोगी आहेत.

१) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर –

मोदक आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. मोदक खाल्लाने तुमची प्रतिकारशक्ती बऱ्याच प्रमाणात टिकवून ठेवता येते. कारण यात तुपाचा वापर केला जातो.

मोदक बनवण्यासाठी शुद्ध तुप वापरले जाते. तुप पोट साफ करते आणि पोटातून हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. तुपामध्ये अ, डी, ई आणि के जीवनसत्त्वे असतात.

जीवनसत्त्वे अ, डी, ई आणि के आपली हाडे, मेंदू आणि हृदयासह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी देखील कार्य करतात.

२) रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर –

मोदकाने उच्च रक्तदाब देखील नियंत्रित केला जाऊ शकतो. घरात मोदक बनवण्यासाठी नारळाचा वापर केला जातो. नारळ आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

नारळामध्ये ट्रायग्लिसेराइड्स नावाचा घटक आढळतो. जो तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो.
ट्रायग्लिसेराइड्स रक्तदाब कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे.

मोदक हे चांगल्या कोलेस्ट्रॉलचा चांगला स्रोत देखील मानला जातो. तुप, नारळ व गुळ कोलेस्ट्रॉलचा चांगला स्रोत मानले जातात. यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोकाही कमी होतो.

३)बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त व्हा –

घरात बनवलेल्या मोदकामध्ये साखरेऐवजी गुळ वापरला जातो. गुळ पाचक प्रणालीसाठी खुप चांगले मानले जाते. हे पचन प्रक्रियेद्वारे बद्धकोष्ठतापासून मुक्त होण्यास मदत करते.

त्याचबरोबर गुळामध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक देखील आढळतात. हे घटक यकृत, आतडे आणि पोट शुद्ध करण्याचे काम करतात.

असे हे गणपती बाप्पाचे मोदक आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. त्यामूळे तुम्ही जास्त मोदक खात असाल तर ते चांगलेच आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.