इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा मोसम गुजरात टायटन्स या संघासाठी संस्मरणीय ठरला आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत खेळत होता. पहिला हंगाम खेळणाऱ्या गुजरातने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे.
गुजरात टायटन्सचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी हा राजस्थान रॉयल्स संघासाठी अडचणीचा ठरला आहे. गुजरातसाठी या मोसमात मोहम्मद शमी खऱ्या अर्थाने मॅच विनर ठरला आहे. पॉवर प्लेमध्ये त्याने विरोधी टीमना खूप त्रास दिला आहे.
मोहम्मद शमीने आयपीएल २०२२ मध्ये पॉवर प्लेमध्ये ११ विकेट घेतल्या आहेत. मोसमातील पॉवर प्ले मधल्या या सर्वाधिक विकेट मोहम्मद शमीच्या आहेत. मोहम्मद शमीने आयपीएलच्या १२ सामन्यांमध्ये विकेट घेतल्या आहेत. १२ सामन्यांमधील ११ सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय झाला आहे.
गुजरात टायटन्सला मोहम्मद शमीने बॉलिंगच्या मदतीने ९० टक्के मॅच जिंकवून दिल्या आहेत. गुजरात टायटन्स संघाचा ३ सामन्यांमध्ये पराभव झाला होता. पराभव झालेल्या सामन्यामध्ये मोहम्मद शमीने एकही विकेट घेतली नाही त्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव झाला आहे.
मोहम्मद शमी गुजरात टायटन्ससाठी आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरला आहे. १५ सामन्यांमध्ये मोहम्मद शमीने २४ च्या सरासरीने १९ विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शमी या आयपीएल मोसममध्ये प्रत्येक १८ व्या बॉलवर विकेट घेत होता.
मोहम्मद शमीने २५ रन देऊन तीन विकेट ही त्याची या आयपीएल हंगामातील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत खेळत होता. या स्पर्धेत गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमीने सर्वेत्तम खेळ दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या:-
मला पाठिंबा देऊन संसदेत पाठवणाऱ्या आमदाराला टाटा सफारी देणार; उमेदवाराची मोठी ऑफर
काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी नाही म्हणून बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम; केले ‘हे’ गंभीर आरोप
शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या; गोपीचंद पडळकरांचे पवारांवर पुन्हा गंभीर आरोप






