सत्यासाठी लढणाऱ्यांना घाबरवता येऊ शकत नाही- राहुल गांधी

 

नवी दिल्ली | गांधी-नेहरू कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या तीन संस्थांवर केंद्र सरकारने घेतलेल्या पावलांवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

केंद्र सरकारने गांधी कुटुंबाशी संबंधित तीन संस्थांना मिळालेल्या पैशांची चौकशी करण्यासाठी एक मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे.

यामुळे राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, मोदीजीँना वाटते की ते कोणालाही धमकाऊ शकतात पण सत्यासाठी लढणाऱ्यांना धमकावता येऊ शकत नसल्याचे त्यांना समजणार नाही.

राजीव गांधी फाउंडेशनला चिनी दूतावासाकडून पैसे मिळाल्याचे आरोप भाजपने केल्यानंतर केंद्र सरकारने या संस्थांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.