भाजपसाठी सत्ता लोकांची सेवा करण्याचे माध्यम आहे-नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली | भाजपसाठी सत्ता हे लोकांचे सेवा करण्याचे माध्यम असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंडले.नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांनद्वारे कोरोनाच्या संकट काळात चालवल्या जाणाऱ्या मदत कार्यांची समिक्षा करुन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

कोरोनाच्या काळात इतक्या दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांन द्वारे केला गेलेला हा राष्ट्रव्यापी कल्याणाचा कार्यक्रम इतिहासातील सर्वात मोठे ‘सेवा यज्ञ’ असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

यावेळी मोदींनी जनसंघ आणि बीजेपीचा जन्म देशाला सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी झाल्याचे म्हटले. हीच प्रेरणा आणि सेवा करण्याची भावना घेऊन मी राजकारणात आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्या पक्षाचे इतके खासदार आहेत, हजारो आमदार आहेत तरीही हा पक्ष आणि पक्षाचा कार्यकर्ता लोकांची सेवा करण्याला प्राथमिकता देतात. सेवा हाच आमच्या जीवनाचा मंत्र असल्याचे मोदी यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.