Tea : ३९ वर्षांपासून अन्नाचा एक कणही न खाता केवळ दोन कप चहावर आयुष्य काढणे सोपे नाही. परंतु, ही गोष्ट खरी आहे. रामबाग दादावाडी येथील साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा एकही कण खाल्लेला नाही. दिवसभरात त्या केवळ दोन कप चहा घेत असतात.
साध्वी विमलयशा १८ वर्षांपासून रामबाग दादावाडी येथे राहतात. गेल्या ३९ वर्षांपासून त्या केवळ दोन कप चहा घेऊन दिवस काढतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजूनही त्या पूर्णपणे निरोगी आहेत. अनेक लोकांना चहामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. मात्र, साध्वी विमलयशा या केवळ चहा घेत असूनही त्यांना कोणताच त्रास होत नाही.
त्या ६२ वर्षांच्या आहेत. परंतु, या वयातही त्यांना कोणताच आजार नाही. त्या दिवसातला पहिला चहा सकाळी ७.३० वाजता घेतात, तर दुसरा चहा ११.३० ते १२ च्या दरम्यान घेत असतात. हा संकल्पाच्या शक्तीचा चमत्कार असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणतात की, साधूंचे आयुष्य हे त्यागासाठी आहे. जेवढा त्याग करू तेवढेच पुढे जाऊ.
तसेच मनावर संयम ठेवणे कठीण आहे, परंतु तुम्ही ठरवलं तर मनाला भरकटण्यापासून थांबवू शकता, असेही त्या म्हणतात. साध्वीच्या सांगण्यानुसार, त्यांनी १४ मे १९७५ रोजी वयाच्या १५ व्या वर्षी जयपूरच्या प्रवर्तनीय शिक्षणश्रीजी महाराज आणि विजेंद्रश्रीजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली. साध्वी यांचे निरोगी शरीर पाहून डॉक्टरही चकित आहेत.
साध्वी विमलयशा यांची तपासणी करणारे डॉ. रुपेश मोदी म्हणतात की, दिवसभरात केवळ दोन कप चहा घेऊनही त्या दिवसभर उत्साही असतात. पुढे ते सांगतात की, दोन कप चहा घेतल्यांनंतर जवळपास १८ ते १९ तासांचा उपवास होतो. एक कप चहामध्ये १५० कॅलरी असतात. त्यानुसार दोन कप चहातून शरीराला ३०० कॅलरी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
साध्वी यांचा दिवस उपासना, आत्म-अध्ययन आणि ध्यानात घालवला जातो. या सर्व कामांना जास्त ऊर्जा लागत नाही. तसेच बराच वेळ चहावर राहिल्याने त्यांचे आतडे आकुंचित झाले आहेत. त्यामुळे त्यांना भूकही लागत नाही. चहापासून साध्वींना जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व घटक मिळतात.
महत्वाच्या बातम्या
Sonali Phogat: वॉशरूममध्ये सोनाली फोगटसोबत २ तास होते हे दोन व्यक्ती, त्या १२० मिनिटांत काय झालं?
Train: गजब टेक्नॉलॉजी! ही ट्रेन जमिनीवर नाही तर उडते हवेत, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
Rohit Sharma: ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज रोहितला भासून देणार नाही बुमराहची उणीव, पाकिस्तानला पडणार तोंडघशी
Chief Justice: कोण आहेत देशाचे नवे चीफ जस्टीस यु यु ललित? सलमान खानच्या काळवीट प्रकरणात आले होते चर्चेत