सध्या उष्णता वाढली आहे. त्यामुळे उन्हामध्ये काम करणाऱ्या मजूर, गवंडी अशा लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर एका फूड डिलिव्हरी बॉयच्या संघर्षाची कथा व्हायरल होत आहे. राजस्थानमध्ये(Rajsthan) एका फूड डिलिव्हरी बॉयने असल्या उन्हामध्ये वेळेत सायकलवरून कोल्ड्रिंक पोहचवले आहेत.(foode delivdery boy story viral on social media)
ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीने फूड डिलिव्हरी बॉयची कथा सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही कथा वाचून अनेकांनी फूड डिलिव्हरी बॉयला पैशांची मदत केली आहे. तसेच अनेकांनी त्याचे कौतुक देखील केले आहे. या फूड डिलिव्हरी बॉयचे नाव दुर्गा मीना असे आहे. तो 31 वर्षांचा असून सायकलवरून फूड डिलिव्हरी पोहचवतो.
आदित्य शर्माने एका फूड डिलिव्हरी अँपवरून ऑर्डर मागविली होती. आदित्य शर्माची ऑर्डर वेळेवर आली होती. त्यावेळी फूड डिलिव्हरी बॉयला सायकलवर बघून आदित्य शर्माला धक्का बसला. एवढ्या उन्हात वेळेवर डिलिव्हरी पोहचवल्याबद्दल आदित्य शर्माने त्याचे कौतुक केले आहे. त्यानंतर आदित्य शर्माने दुर्गा मीना या फूड डिलिव्हरी बॉयची कथा ट्विटरवर शेअर केली आहे.
आदित्य शर्माने ट्विट करत म्हंटले आहे की, “आज माझी ऑर्डर वेळेवर पोहोचली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी बॉय सायकलवर आला. शहरातील तापमान 42 अंश आहे, तरीही मला वेळेवर ऑर्डर मिळाली”, असे आदित्य शर्माने ट्विटमध्ये म्हंटले आहे. आदित्य शर्माने यासंदर्भात आणखीन एक ट्विट केलं आहे.
https://twitter.com/Adityaaa_Sharma/status/1513463815576293377?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1513463815576293377%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Ffood-delivery-boy-inspirational-story%2F
“फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव दुर्गा मीना असे आहे. दुर्गा मीना ३१ वर्षांचे असून गेल्या 4 महिन्यांपासून जेवण पोहोचवण्याचे काम करत आहेत. फूड डिलिव्हरीचे काम करून त्यांना 10 हजार रुपये पगार मिळतो. ते व्यवसायाने शिक्षक असून गेल्या 12 वर्षांपासून काम करत आहेत. पण कोविड काळात त्यांची नोकरी गेली. दुर्गा मीना माझ्याशी इंग्रजीत बोलत होते”, असे आदित्य शर्मा यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.
https://twitter.com/Adityaaa_Sharma/status/1513463815576293377?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1513463827890774017%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Ffood-delivery-boy-inspirational-story%2F
दुर्गा मीना यांची माहिती देताना आदित्य शर्मा यांनी सांगितले की, “त्यांनी बीकॉमचे शिक्षण घेतले आहे. त्यांना पुढे मास्टर्स पूर्ण करायचे होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मास्टर्स करता आले नाही. म्हणून सध्या दुर्गा मीना Zomato मध्ये काम करत आहेत. त्यांना इंटरनेटबद्दल सर्व काही माहित आहे.
दुर्गा मीना यांच्या संघर्षाची कथा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना आर्थिक मदत केली आहे. आदित्य शर्मा यांनी 75,000 उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण तीन तासांत सुमारे दीड लाख रुपये जमा झाले आहेत. परदेशातून देखील लोकांनी मदत केली आहे. या पैशांतून आदित्य शर्मा दुर्गा मीना यांच्यासाठी एक बाईक घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंचा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करत काश्मिरी पंडितांकडून बॅनरबाजी, जम्मूत सभेचे थेट प्रक्षेपण करणार
“धर्माने हिंदू असलेल्या राजसाहेबांनी हिंदुत्व हाती घेतले तर त्यात गैर काय?
बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, पीडित तरुणीने चित्रा वाघांवरच केले गंभीर आरोप, म्हणाली…