नवरात्रीचे नऊ दिवस उपवासात ‘हा’ आहार घ्या आणि वाढवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती

सध्या अनेक सणांची सुरुवात झाली आहे. त्यामूळे तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवानंतर अनेक जण नवरात्रीची वाट बघत होते. आत्ता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे.

नवरात्र हा तरुणाईचा आवडता सण आहे. त्यामूळे अनेक जण या सणाची वाट बघत असतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरू आहे. म्हणून सर्वजण अनेक रंगाचे कपडे घेतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस अनेकांचे उपवास असतात. काही जण उठता बसता उपवास करतात. तर काही जण नऊ दिवस खुप कडक उपवास करतात. या उपवासाचा तुमच्या तब्येतिवर परिणाम होऊ शकतो.

म्हणून हा उपवास करताना तुम्हाला स्वतः ची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनामूळे तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. कारण कोरोनाशी लढा देण्यासाठी तुम्हाला खुप जास्त ताकदीची गरज आहे.

तुमची रोगप्रतिकारक शक्ती जास्त हवी. तरच तुम्ही कोरोनापासून वाचू शकता. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य आहार घ्यावा लागतो. योग्य आहार असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

म्हणून नवरात्रीच्या उपवास करताना तुम्हाला आहाराविषयी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया अशा आहाराबद्दल ज्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढेल आणि तुमचा उपवासही तुटणार नाही.

तुमचा उपवास असेल तर मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर सुका मेवा (ड्राय फ्रुट ) खा. सुक्या मेव्याचे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. सुक्या मेव्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ताकद मिळेल. सुका मेवा रात्री दुधात भिजू घालून सकाळी ते दुध पिल्यास ते ही खुप फायदेशीर ठरेल.

तुम्हाला तुमचा नाशता खुप चांगला घ्यायला हवा. म्हणून तुम्ही शिंगाडा पिठाची भजी, साबुदाणा खिचडी, दही आणि रताळं, चणापुरी किंवा हलवा खाऊ शकता. हा नाशता तुम्हाला खुप फायदेशीर ठरेल.

नाशत्यानंतर दुपारचे जेवण येते. दुपारच्या जेवणात भाजी भाकर असा पुर्ण जेवण करत असता. पण तुमचा उपवास असेल तर मग तुम्ही जेवणात बटाट्याची भाजी, राजगिरा किंवा शिंगाडा पिठाची भाकरी किंवा उपवासच थालीपीठ बनवून खा. सोबत वरीचे तांदूळ आणि कढी घ्या.

संध्याकाळच्या वेळी तुम्हाला भुक लागली तर मग ताक, लस्सी किंवा ताजी फळे खा. सोबतच साबुदाणा वडा खा. पण फळांचे प्रमाण जास्त ठेवा. तुम्हाला फळांमूळे जास्त एनर्जी भेटेल. तुम्ही हा आहार नऊ दिवस बदलू शकता.

रात्री तुम्हाला जास्त भुक नसेल तर दुध घ्या. पण भुक असेल तर मग दह्यासोबत वरीच्या तांदळाचा भात आणि आमटी खा. त्यासोबतच राजगिरा किंवा शिंगाडा पिठाची रोटी आणि पनीरची भाजी खा. हा आहार तुमच्या शरीरासाठी उत्तम ठरेल.

असा आहार घेतल्याने तुम्हाला खुप फायदा होईल. सोबतच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोना काळात असा आहार तुम्हाला फायदेशीर आहे. यात तुम्हाला आवडेल तसे बदल करून तुम्ही नवीन काहीतरी बनवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या –

सर्वांची पोल खोलणाऱ्या करण जोहरला सलमान खानने त्याच्या पहिल्याच चित्रपटात रडवले होते

पानटपरी चालवनारे भाऊ कदम अख्ख्या महाराष्ट्राचे हास्यसम्राट झाले; पहा कसा झाला हा चमत्कार

तुम्हाला माहीत नसेल पण शाहरूखने एकदा दोनदा नाही तर चक्क तीन वेळा लग्न केले आहे; वाचा पुर्ण किस्सा

..म्हणून आमीर खान बाॅलीवूडपासून दूर राहतो; स्वत: आमीरनेच सांगीतली बाॅलीवूडची काळी बाजू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.