आफ्रिकेतील या पठ्ठ्याने रामदेव बाबालाही दिली टक्कर, शरीराची अशी घडी करतो की..; पाहा व्हिडीओ

सोशल मिडिया एक असं माध्यम झालं आहे की त्यावर व्हिडिओ, फोटो शेअर करत अनेकजण रातोरात स्टार झाले आहेत. काही असे अॅप देखील आहेत ज्यावर आपल्या अंगातील कला दाखवून आपण प्रसिध्दी मिळवू शकतो.

सोशल मिडियावर काही आनंददायी व्हिडिओ असतात. तर काही दु:खद व्हिडिओ असतात. पण काही व्हिडिओ असे असतात की एकच व्हिडिओ आपल्याला अनेकवेळा पाहू वाटतो. तसेच व्हिडिओमधील व्यक्तीच्या कलेचे कौतूक करू वाटते.

सोशल मिडियावर सध्या असाच एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी आफ्रिकेतील बाबा रामदेव असं कॅप्शन दिलं आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता, एक तरूण टी शर्ट, पॅन्ट, पिवळ्या रंगाची टोपी घालून एका कारसमोर उभा आहे आणि तो आपल्यातील अनोखी कला  लोकांना दाखवत आहे. लोक त्या तरूणाचा व्हिडिओ शुट करत आहेत.

व्हिडिओमध्ये तरूणाने पाय वर उचलत उल्टा फिरवला आहे. त्यानंतर त्याने पाठीमागे फिरून हाताची घडी घातली आहे. त्यानंतर तो पाठीमागूनचं कमरेपर्यंत हात नेत खाजवत आहे. त्यानंतर शर्ट वर करत त्याने पोट आत घेऊन पोटाचा खड्डा केला आहे.

त्यानंतर हातात हात घालून तो पायाखालून हात घेत पाठीमागून फिरवून डोक्यावरून परत समोर आणत आहे. नंतर जमीनीवर बसून  पाय खांद्यावर घेतला आहे. त्यानंतर पायानेच डोक्यावरील टोपी काढत आहे आणि परत डोक्यावर घालत आहे.

सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हिडिओ पाहून या तरूणाच्या आगळ्या वेगळ्या कलेचे कौतूक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
अवघड आहे! कोरोना पेशंटचे झाले लग्न; पीपीई किट घालून नवरी लग्नात आली
जामनेरचा आमदार कुठे मेला.?, गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो; खडसेंच्या क्लिपने राज्यात खळबळ
पायाने घालतो डोक्यावर टोपी, पोट चाकासारखं गोल फिरवतो; पाहा रामदेव बाबाला टक्कर देणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.