Share

पैसा वसूल ऑफर! Flipkart वर फक्त ८०० रुपयांत मिळवा ३२ इंचाचा स्मार्ट टिव्ही, उरले फक्त काही दिवस

Flipkart-TV-offer.j

कोरोना काळापासून लोकांचा ऑनलाईन शॉपिंगकडे ओढा वाढला आहे. ग्राहक वस्तू घेण्यासाठी Flipkart सारख्या ऑनलाईन शॉपिंग साईटचा वापर करत आहे. या ऑनलाईन शॉपिंग साईटच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे सेल आणि ऑफर्स दिल्या जातात. सध्या Flipkart वर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती मोठी ऑफर दिली जात आहे.(Flipkart new sale big offer on smart tv)

Flipkart वर २३ फेब्रुवारीपासून एक विशेष Flipkart इलेक्ट्रॉनिक्स मेगा सेल(Mega Sale) सुरू झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉप(Laptop) सारख्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर प्रचंड सूट मिळत आहे. Flipkart चा हा सेल २८ फेब्रुवारीपर्यंतच सुरु राहणार आहे. ज्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायच्या आहेत, त्यांना या सेलचा मोठा फायदा होणार आहे.

Flipkart वरील या सेलमध्ये तुम्ही जुना टीव्ही बदलून नवीन स्मार्ट टीव्ही घरी आणू शकता. या ऑफरमध्ये ८०० रुपयांपेक्षा कमी किमतीत 3D साउंडसह स्मार्ट टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता. Acer Boundless Series 80 cm (32 इंच) HD Ready Smart LED Android ह्या स्मार्ट टीव्हीवर ऑफर दिली जात आहे.

या टीव्हीची सध्या बाजारात किंमत २२,९९० रुपये आहे. पण Flipkart इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये ग्राहक हा टीव्ही १२, ९९९ रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात. या टीव्हीवर ४३% डिस्काउंट देण्यात आला आहे. हा टीव्ही खरेदी करताना IDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला १० % म्हणजेच रु. १,२३५ रुपयांची झटपट सूट मिळेल. ज्यामुळे टीव्ही तुम्हाला ११,७६४ रुपयांत खरेदी करता येईल.

या सेलमध्ये Flipkart तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीच्या बदल्यात हा स्मार्ट टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता. या टीव्ही एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही ११,०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. या ऑफरचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळाल्यास स्मार्ट टीव्हीची किंमत ११,७६४ रुपयांवरून केवळ ७६४ रुपयांपर्यंत कमी होणार आहे.

Acer Boundless Series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV हा Android स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये 32-इंचाचा डिस्प्ले आहे. या टीव्हीमध्ये HD रेडी आणि 1,366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. तसेच 60Hz रिफ्रेश रेटस देखील आहे. या टीव्हीमध्ये तुम्हाला 24W साउंड आउटपुट, 3D डॉल्बी साउंड सुविधा आहे. या टीव्हीमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि YouTube सारख्या अँप्सचा वापर देखील करता येईल.

महत्वाच्या बातम्या :-
कुत्र्याला घरात काय गादीवर घेऊन झोपा, आमचं काही म्हणणं नाही, पण..; अजितदादा पुणेकरांवर भडकले
जीवघेणी मिठी! छातीला स्फोटकं बांधून बायकोला मारली मिठी; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल
‘या’ गावात घरोघरी पाळले जातात विषारी साप; सापांसोबत खेळतात मुलं, कारण वाचून आश्चर्य वाटेल

इतर

Join WhatsApp

Join Now