मॉडेलचे कपडे बघून फ्लाईट अटेंडेंटला वाटली लाज, स्व:ताचे जॅकेट काढून दिले आणि…

इंस्टाग्राम मॉडेल इजाबेल एलेनॉरला त्यावेळी अडचणींचा सामना करावा लागला जेव्हा तेव्हा तिला विमानात येण्यापासून रोखण्यात आले. तिला फ्लाईट अटेंडेंटने छोटे कपडे असल्यामुळे दरवाजातच रोखले. द सनने दिलेल्या वृत्तानुसार जेस्टार एअरवेजमधील एका क्रु मेंबरने तिला सांगितले की तुमचे कपडे विमानात घालण्यासारखे नाहीत.

इजाबेलला जॅकेट घालण्यास सांगितले गेले पण तिच्याकडे जॅकेटच नव्हते. यानंतर क्रु मेंबर्सने आपल्या सदस्यांशी बोलून तिच्यासाठी एका जॅकेटची व्यवस्था केली. या घटनेनंतर इजाबेलला धक्का बसला. तिने विमानामध्ये ब्लॅक क्रोप टॉप आणि निळी जिन्स घातली होती.

तिच्या म्हणण्यानुसार तिच्यासोबत ही घटना तेव्हा घडली जेव्हा तिने गोल्ड कोस्ट ते मेलबर्नपर्यंत फ्लाईट बुक केली होती. ती तिच्या पतीसोबत प्रवास करत होती. तिने सांगितले की, विमानातील एका फ्लाईट अटेंडेंटने माझ्याकडे पाहिले आणि तो म्हणाला की तुमच्याकडे एखादे जॅकेट आहे का? मला वाटले ते मला यासाठी विचारत आहेत की मला थंडी वाजू नये.

कारण मेलबर्नमध्ये थंडी आहे असे मला वाटले. यानंतर एका महिलेने मला सांगितले की तुम्ही जे कपडे परिधान केले आहेत त्या कपड्यांमध्ये तुम्ही विमानात प्रवास करू शकत नाही. तुम्ही बिकीनीवरसुद्धा विमानात प्रवास करू शकत नाही.

फ्लाईट अटेंडेंटने आपल्या क्रु ला बोलावले आणि जॅकेटची मागणी केली. यानंतर फ्लाईट अटेंडेंटने तिला जॅकेट दिले. यानंतर इजाबेलला खुप लाज वाटली. कारण सगळे लोक तिच्याकडेच बघत होते. या प्रकरणात जेस्टारने आपली बाजू मांडली.

त्यांनी सांगितले की फ्लाईट अटेंडेंटला एयरलाईन्स पॉलिसीबद्दल फारशी माहिती नव्हती. त्याच्याकडून चुक झाली आहे आणि एअरलाईन कंपनीने मॉडेलची माफीही मागितली आहे. सध्या हे प्रकरण खुप चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी गाझीपुरला जातेय’
…आणि एलियनसारखं दिसण्यासाठी त्याने आपले ओठ, कान, नाक कापले
सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात
रेणूनंतर करूणा शर्माने केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा धक्कादायक खुलासा; म्हणाले….  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.